वंचित बहुजन आघाडीचा प्राथमिक आरोग्य केंद्रावर डफली मोर्चा

26

🔸आक्रमक आंदोलकांना केले पोलिसांनी स्थानबद्ध, वैद्यकीय अधिकारी तात्काळ होणार रुजू

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.23सप्टेंबर):-गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठल्याही प्रकारची आरोग्य विषयक सोयी सुविधा नाही, सद्या सर्दी खोकला ताप डेंगू मलेरिया या आजाराने जनता त्रस्त आहे,परंतु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या आजारावर उपचार करण्यासाठी कुठलीही सुविधा येथील आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने या विषयी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत प्राथमिक आरोग्य केंद्रावर वंचित चे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, नगरसेवक तथा माजी सभापती संबोधी गायकवाड यांच्या नेतृत्वात डफली बजाओ मोर्चा काढून आरोग्य विभागाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले,वंचित बहुजन आघाडी च्या आंदोलनाची दखल घेत एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी तात्काळ रुजू होणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोविंद जाधव त्यांच्याकडून आंदोलकांना आश्वासन देण्यात आले या सह लवकरच महिलांसाठी प्रसूतिगृह सुरू होणार, कुटुंबनियोजनाचे कॅम्प सुरू होणार आहेत.

येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा भरणा लवकर होणार आहे असे आश्वासन आरोग्य विभागाकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आले,दरम्यान आंदोलकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, औषधी चा साठा आहे नाही, प्रसूती गृह नाही,कुटुंब नियोजनाचा कॅम्प नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज असलेल्या इमारतीमध्ये कुठलीही रुग्णांना सोय सुविधा उपलब्ध नाही याविषयी आरोग्य विभागाने तात्काळ आंदोलकांना लेखी स्वरूपात उत्तर द्यावे अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडी ने घेतली.
त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या लवकरच मान्य करू असे आश्वासन दिले आरोग्य विभागाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास, वंचित बहुजन आघाडी ने पुन्हा एकदायेत्या काही दिवसात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे ,नगरसेवक संबोधी गायकवाड, नगरसेविका बशनूर बि सय्यद खलील, संतोष जोगदंडे,तालुका अध्यक्ष उमरखेड, सीमाताई गायकवाड महिला आघाडी तालुकाप्रमुख, गोंटू राऊत, गोलू मुनेश्वर, सुमित कदम, पप्पू गायकवाड, श्याम राऊत, समाधान राऊत, धम्मपाल गायकवाड, अमोल पाटील, विजय गायकवाड, अजय कदम लड्डा घुगरे, संतोष कुलदीपके , स्वप्निल मुनेश्वर,सुमित कदम,मिलिंद कदम,आकाश राऊत,प्रेम कदम ,रेखा पाईकराव,निर्मला गायकवाड, संध्याबाई विणकरे,अमोल नरवाडे, किरण भालेराव,भारत कांबळे,अलीम कुरेशी विवेक काशी नंद जुग्गु गायकवाड रितेश गायकवाड,कमल विणकरे ,लता गायकवाड ,छाया वाठोरे, आशा गायकवाड ,सूर्यकांता राऊत,या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या वळू बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस , यांनी पि एस आय ,कपिल म्हस्के,जमादार रवी गीते,मोहन चाटे, हाके, निलेश भालेराव,सतीश चव्हाण,असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.