झरीजामणी ग्रामरोजगार सेवक संघटनेचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

30

✒️प्रतिनिधी झरीजामणी(सुनील शिरपुरे)

झरीजामणी(दि.2ऑक्टोबर):-सन 2005 साली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. महात्मा गांधी ग्रामीण योजनेचे कामे हाताळण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ग्राम सभेच्या माध्येमातून ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कामे ग्राम रोजगार सेवक तत्परतेने हाताळत आहे. तरी पण महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांच्या आवश्यक गरजांसंबंधी वेळोवेळी पाठपुरावा करून मागण्या केल्या जात आहे. परंतु आजपर्यंत एकाही मागणीची पूर्तता करून ग्रामरोजगार सेवकाला न्याय मिळालेला नाही. या मागण्यांसंदर्भात ग्रामरोजगार सेवकाला आशेवर ठेवल्या जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मा.गटविकास अधिकारी साहेब, मा.तहसिलदार साहेब व पोलिस स्टेशन यांना दिलेल्या ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करण्याच्या 24 तारखेला दिलेल्या निवेदनानुसार महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रभर आपआपल्या तालुका स्तरावर तहसिल कार्यालयापुढे ग्रामरोजगार सेवक संघटनेतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून झरीजामणी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे हे एक क्षणचित्र.

आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रात २८१४४ ग्रामरोजगार सेवक असून सदर ग्रामरोजगार सेवक सण २००६ पासून कार्यरत आहे. त्यांना शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून 6 टक्के मानधानावर कार्य करावे लागत आहे. मात्र त्यांना अजूनही शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले नाही. त्यामुळे वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून देखिल शासन दरबारी अद्यापही काही निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय उपोषण ग्रामरोजगार सेवक संघटनांमार्फत करण्यात येत आहे. त्याचेच पालन करण्याच्या हेतुने झरीजामणी तालुका ग्रामरोजगार संघटना देखील आज उपोषण करत आहे.