मागील चार वर्षा पासून बंद असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार चालू करण्याची मागणी

76

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11जून):-सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आधार मित्र मंडळ गंगाखेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

गंगाखेड येथे पालकमंत्री तथा समाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सत्काराचे आयोजन पूजा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यामध्ये आधार मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की 1971-72 या वर्षापासून चालू असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार अनुसूचित जाती ,अनुसुचित जमाती,विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्गीय यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी पीडित,दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करुन सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थाचा त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

परंतु मागील चार वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराकडे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराकडे दुर्लक्ष न करता येणाऱ्या 14 एप्रिल दिनी हा पुरस्कार जाहीर करण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर प्रा.जयपाल पंडित,अँड विजय साळवे,तत्वशील साळवे, मनोज हनवते, अनिल भिसे, अमित जंगले ,राजेभाऊ पंडित,गौतम हातागळे,धम्मानंद साळवे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत