डॉ सुरेश साबळे यांना पुन्हा बीड जिल्हा सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत करा-दत्ता वाकसे

36

🔹”बहुजन समाजाचे नेते दत्ता वाकसे यांचे मुख्यमंत्री कार्यालयालास पत्र”

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.11ऑगस्ट):-सर्वसामान्य माणसाला हक्काचे रुग्ण सेवा मिळावी जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये योग्य सेवा मिळावी हा उद्देश मनाशी घेऊन अतिशय तळमळीने आणि चांगल्या प्रकारे आपल्या पदाची ऊर्जा वाढवणारे डॉ सुरेश साबळे यांना पुन्हा बीड जिल्हा सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत करा अशी मागणी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हॉइस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडे ई-मेल द्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे की पुन्हा त्यांना बीड जिल्हा सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत करण्यात यावे जिल्ह्यातीलच काही राजकीय नेत्यांनी राजकीय दोषापोटी डॉ सुरेश साबळे यांना पदावरून हटवण्यासाठी अट्टहास केला होता तो अट्टाहास तात्काळ थांबवा व सर्वसामान्य माणसाला रुग्णसेवा व्यवस्थितपणे उपलब्ध करून देणारे सर्वसामान्य माणसाला रुग्णालयाच्या माध्यमातून आधार देणारे सिव्हिल सर्जन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आज त्यांच्यामुळे अतिशय डबघाईला आलेले व व्यवस्थित रित्या चालत नसलेले अनेक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय चांगल्या प्रकारे सुरळीत होऊन ते पुन्हा चांगली रुग्णसेवा देताना दिसत आहेत आज परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवेचा अतिशय खूप मोठ्या प्रमाणात बोजवर आवाज आला होता परंतु सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत झाल्यानंतर डॉक्टर सुरेश साबळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय हे कार्यनूत केले होते.

कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या त्या तक्रारीचा निरीक्षण चांगल्या प्रकारे करून व्यवस्थितरित्या ग्रामीण भागातील रुग्ण सेवा ही सुरळीत करून ठेवली होती परंतु मध्येच राजकीय दोषापोटी त्यांच्यावर बदलीची कारवाई अतिशय दोषा पोटी असून त्यांना तात्काळ पुन्हा बीड जिल्हा सिव्हिल सर्जन म्हणून कार्यान्वित करावे अशा मागणीचे पत्र शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र सादर करत केली आहे ते म्हणाले की तात्काळ त्यांना पुन्हा कार्यरत केले नाही तर आंदोलनाचा बडगा उभारणार असून याला सर्वोच्च जबाबदार आपण रहाल असे देखील त्यांनी दिलेले पत्रात म्हटले आहे