ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून निरंतर रुग्णसेवा सुरू राहील – देवराव भोंगळे

30

🔸रुग्णांची तुकडी शस्त्रक्रियेसाठी नागपूरला रवाना

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.19ऑगस्ट):-येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे रुग्णांची पहिली तुकडी शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी सकाळी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून नागपूरला रवाना करण्यात आली आहे.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ३० जुलै रोजी घुग्घुस येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात रुग्णांच्या हृदय, डोळे व विविध आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या होत्या. याप्रसंगी तब्बल साडे सहा हजारांच्या वर रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली होती.त्याअनुषंगाने ४१ रुग्णांची पहिली तुकडी कॅन्सर, हृदय, डोळे, मेंदू, हरणीया, अस्थिरोग, किडनी, दंतचकित्सा अश्या विविध आजारावरील शस्त्रक्रियेसाठी नागपूरला रवाना करण्यात आली.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी घुग्घुस व पोंभुर्णा शहरामध्ये महाआरोग्य शिबीर घेण्यात येते. शिबिरामधील ४१ रुग्णांची पहिली तुकडी नागपूरला रवाना करीत आहो. ५ वर्षाच्या मुलीपासून ते ८५ वर्षाच्या वयोवृद्धांना कॅन्सर, हृदय, डोळे, मेंदू, हरणीया, अस्थिरोग, किडनी, दंतचकित्सा अश्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना नेण्यात येत आहे. मागील सात वर्षापासून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. रुग्णांची दुसरी तुकडी लवकरच पाठविण्यात येणार आहे. सर्व रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, पूजा दुर्गम, हेमराज बोंबले, अमोल थेरे, तुलसीदास ढवस, शरद गेडाम, सुनील बाम, शाम आगदारी, सिनू कोत्तूर, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, कोमल ठाकरे, विजय माथणकर,राजेश मोरपाका, अण्णा कदम, रतन कोंडावार, सुनील राम व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते