✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.2सप्टेंबर):- तालुक्यातील आकापुर ग्रा.पं अंतर्गत जंगलव्याप्त व एका टोकावर वसलेल्या येनोली (खुर्द ) येथील खनिज निधीतुन मंजुर सिमेंट रोड चे भुमीपुजन या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे हस्ते करण्यात आले .
जि.प.निवडणुकीचे वेळी येनोली गाववासियांनी या गावाला येणाऱ्या रस्त्याची दुर्दशा व गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष बघता मतदानावर बहिष्काराची भुमिका घेतली होती . संजय गजपुरे यांनी निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेत मतदानात सहभागी झाले होते . निवडणुकीनंतर या गावाला जाणाऱ्या ४ किमी.रस्त्याचे एक वर्षाचे आतच तत्कालिन पालकमंत्री मान.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन निधी प्राप्त करुन डांबरीकरण करीत आश्वासनाची पुर्तता केली होती व गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता.

जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी येनोली गावासाठी दिलेला शब्द पाळत विविध विकासकामे मंजुर केली आहेत. यात जि.प.शाळेची वर्गखोली दुरुस्ती , नविन आंगणवाडी चे ईमारत बांधकाम , जनसुविधा निधीतुन स्मशानभुमी ओटा बांधकाम, माता मंदिर चावडी बांधकाम , सिमेंट बाके , खनिज निधीतुन सिमेंट रस्ता यांचा समावेश असुन बहुतांश कामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दिलेला शब्द पुर्ण होत असल्याची प्रचिती गावकरी अनुभवत असल्याचे चित्र या गावात आहे.
या भुमीपुजनाचे वेळी आकापुर ग्रा.पं. चे उपसरपंच मोरेश्वर निकुरे , माजी सरपंच व ग्रा.पं.सदस्या श्रीमती निताताई बोरकर , येनोली चे मुखरु पाटील आनंदे , सुनिल मरसकोल्हे , बाळापुर चे माजी सरपंच धनराज बावणकर , भोजराज नवघडे, मनोज कोहाट , सचिन चिलबुले व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED