बसच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण ठार

10

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

वडवणी(दि.4सप्टेंबर):-बीड परळी रोडवर असलेल्या बाबी तांडा (ता.वडवणी) वस्तीवरील गतिरोधकवर भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एका गंभीर जखमी झालेली तरुणाचा उपचारासाठी घेवून जाताना वाटेतच मृत्यू झाला. गुरुवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ओम राऊत (वय २५) व ऋषिकेश शेळके (वय २०) दोघे रा. उपळी अशी मयत तरुणांची नावे आहेत.

हे दोघे गुरुवारी रात्री दुचाकीवरुन वडवणीहून उपळी गावाकडे जात होते. ते बावी तांड्यानजिक आलेले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बीड-परभणी या बसने क्र. (एमएच २० बीएल ३६१२) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ऋषिकेश शेळके हा जागीच ठार झाला व ओम राऊत याला उपचारासाठी बीड येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने उपळी गावात शोककळा पसरली आहे.