संस्थाचालकांच्या विरोधात कर्मचार्यांच्या कुटूंबीयांचे संस्थेच्या आश्रमशाळेसमोर बेमुदत आमरण उपोषण

19

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.4सप्टेंबर):-केज तालुक्यातील पाथरा येथील आश्रमशाळेतील कर्मचारी आणि संस्थाचालक यांच्या तील वाद सर्वश्रुत आहे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळेतील विद्यमान संस्थाचालक लहू बनसोडे सर यांनी दिनांक ८ मार्च २०१९ रोजी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अनुदान संदर्भिय निर्णय घेतल्यानंतर संस्थाचालकांनी सदरील उपोषणार्थिंच्या पती व नातेवाईकांना नियुक्ती पत्रक दिल्यापासून आजतागायत सदरील कर्मचारी पवित्र ज्ञानदानाचे काम करिता असलेल्या कर्मचार्यांना ठरलेला व्यवहार पुर्ण केलेला असताना संस्थाचालकांनी अतिरिक्त पैशाची मागणी करत शाळेवर येण्यास उपोषणार्थिंच्या पतींस व नातेवाईकांना मज्जाव करत शाळेतून काढून टाकण्यात आले.

अशी तक्रार व विनंती अर्ज , निवेदन उपोषणकर्ते व त्यांचे पती व नातेवाईक यांनी मुख्यमंत्री महोदय, सामाजिक न्याय मंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण राज्यमंत्री, संबंधित सर्व मंत्री महोदय , विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष व शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब ,प्रधान सचिव साहेब, सहसचिव कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई, आयुक्त पुणे, प्रादेशिक आयुक्त औरंगाबाद, सहाय्यक आयुक्त बीड यांच्या दालनात तीन वेळा सुनावणी झाली आहे तरी अद्यापही कसलाही ठोस निर्णय झाला नाही.मागिल दिड वर्षांपासून वरील संबंधित विभागातिल कार्यालयात प्रत्यक्षरित्या पाठपुरावा करून काहीही निर्णय लागत नसल्यकारणामुळे सद्यस्थितीत आमचे सर्व मानसिक, शारीरिक, आर्थिक खच्चिकरण झाले असल्याने आमच्या पतिंना व नातेवाईकांना आता तरी न्याय मिळेल यासाठी आम्ही दि-२सप्टेंबर पासून विविध मागण्यासाठी आमरण उपोषणास बसलो आहोत असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे.

उपोषणार्थी:- सौ.उषाअमरसिंग कदम,सौ.नमिता संजय बनसोडे,छाया सतिष सातपुते,संध्या अमोल सोनवणे,वंदना संजय सोनवणे, सुनिता परमेश्वर कांबळे, शितल संभाजी कांबळे, संजय मारूती सोनवणे, परमेश्वर ईश्र्वर कांबळे,सार्थक संजय बनसोडे,राजवीर संभाजी कांबळे इत्यादी अकरा जण उपोषणास बसले आहेत.
त्यांच्या मागण्या या सुरुतीपासूंन कार्यरत असलेल्या कर्मचारी यांचे शालेय अभिलेखे प्रमाणे कागदपत्रे तपासून नियमाप्रमाणे नमुद कर्मचार्यांना शाळेची संच व वैयक्तिक मान्यता देते वेळेस सदरील कर्मचारी आमचे पती व नातेवाईक याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा,शाळेची सर्व कर्मचारी अभिलेखे तपासणी काही आपल्या कार्यालयांकडे हस्तगत करणे, सर्व अभिलेखे तपासणी कामी व कार्यालयाने हस्तगत करुन संस्थाचालकांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करून सदरील कर्मचार्यांचे तात्काळ नियुक्तींचे आदेश देण्यात यावे,सदरील प्रकरण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयीन स्तरावर येत नसेल तर ज्या कार्यालयाच्या अधिकार कक्षेत येते त्यांना कळवून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अंतिम निर्णय लागत नाही तो पर्यंत संस्थेला आलेल्या संच मान्यता व वैयक्तिक मान्यता प्रस्तावावर निर्णय घेण्यात येऊ नये तसेच निर्णय लागेपर्यंत शाळेतल्या सर्व कामाकाजावर प्रतिबंध लावण्यात यावा,मा.धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत संस्थेची चौकशी करून संस्थेचे कार्यकारी मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा,मा. मंत्री महोदय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांच्या दालनात तात्काळ सुनावणी घेऊन निर्णय देण्यात यावा या प्रमुख आठ मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणास बसलेले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली असून संबंधित बीड प्रशासनाने दखल घेण्यात येऊन अन्याग्रस्त उपोषणकर्ते यांना तात्काळ न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली.