अतिवृष्टीमुळे ओलादुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व पुरपिढीतांना नुकसान भरपाई देण्यात यावी

15

🔸शिवसेनेने केली मागणी

✒️संतोष संगीडवार(आलापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आलापल्ली(दि.4सप्टेंबर):-दिनांक 3 सप्टेंबर रोजी ला शिवसेनेचे अरुणभाऊ धुर्वे यांच्या नेतृत्वात भामरागड तालुक्याच्या दौरा करून तालुक्यातील शेतकरी, पुरपिढीतांची प्रत्यक्ष भेट घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे भामरागड तालुक्याचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठयाप्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे भामरागड तालुक्याला ओलादुष्काळ जाहीर करण्यात यावे तसेच पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचा पंचनामा करून संबधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी तहसीलदार यांचे मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुणभाऊ धुर्वे, बिरजू गेडाम संघटक, भामरागड तालुका प्रमुख खुशाल मडावी, उपतालुका प्रमुख नासिर पठाण, अहेरी तालुका प्रमुख प्रभारी सुभाष घुटे उपतालुका प्रमुख प्रफुल येरणे, माजी युवासेना उप प्रमुख दिलीपभाऊ सुरपाम, शिवसैनिक अनिल येनगंटीवार, आनंदराव आकुलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.