गोब्रा तांडा वासियांना झाली आर ओ शुद्ध पाण्याची व्यवस्था

14

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.5सप्टेंबर):-मौजे बारड अंतर्गत गोब्रा तांडा येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत बंजारा समाजासाठी समाज मंदिर मंजूर झाले असून या समाज मंदिराचे भूमिपूजन तसेच गोब्रा तांडा येथील लोकांसाठी मोफत 14 वा वित्त आयोग योजनेतून शुद्ध पिण्याच्या पाण्याची ( आर ओ) व्यवस्था केली असून याचे देखील उद्घाटन बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच विलासराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव लोमटे, शिवाजीराव देशमुख, अमृता राठोड, गोविंद पवार, पंडित जाधव, रामा राठोड, गुलाब राठोड, फुलसींग राठोड, रामराव राठोड, शामराव राठोड, भीमराव राठोड, वसंत राठोड व तसेच इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती.