जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रघुनाथराव पांडे नायगांव यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान

    41

    🔹कंट्रोल क्राईम अन्ड इन्फोर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट दिला पुरस्कार

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.सप्टेंबर ):-कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असताना याच लाॅकडाऊच्या काळात जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रघुनाथराव पांडे नायगांव यांनी आपले कर्तव्य समजून जिवाची कुठलीच पर्वा न करता पत्रकारितेच्या माध्यमातून कोरोना महामारीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली याच केलेल्या सेवा कार्याचा सन्मान व्हावा म्हणून कंन्ट्रोल क्राईम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टीव्ह ट्रस्टच्या वतीने आॅनलाईन पुरस्कार यामध्ये यांना कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आॅनलाईन देऊन पत्रकारितेच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने केलेल्या सेवाकार्याची प्रशंसा केली.

    कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळे आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे, असे मत ट्रस्ट चे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर आमच्या वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केले जेष्ठ पत्रकार बाळासाहेब रघुनाथराव पांडे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.