मातृभाषा मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न हवेत

29

मराठी ही आपली मातृभाषा आहे. या आपल्या भाषेला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा आहे .महाराष्ट्र ही थोर संतांची पवित्र भूमी मानली जाते. आपला महाराष्ट्र छ्त्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. संतांनी आपल्या वांगमायतून लेखनातून जनसामान्यांना, थोर शिकवण आणि प्रगल्भ ज्ञान दिले. हे सर्व मराठी जी आपली मातृभाषा आहे. त्याबरोबरच अनेक महापुरुषांची आत्मचरित्र, काव्य, वांग्मय तसेच अनेक ग्रंथ यापासून मिळणारी ऊर्जा ही शेकडो वर्षापासून आज पर्यंत टिकून आहे. ती आपल्या मराठी माणसांसाठी संकटाशी लढण्यासाठी एक संजीवनीच आहे. म्हणून या मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. वाढत्या जागतिकीकरणामुळे बरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजीला आपण आपल्या जीवनात योग्य स्थान दिले आहेच परंतु समृद्ध मराठी मातृभाषा टिकवण्यासाठी शासनाबरोबरच जनमाणसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनाने मराठी शाळांना अनुदान तर दिले पाहिजे. त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे. साहित्य संमेलन, व्याखानमाला, काव्य संमेलन यामार्फत मराठी भाषा समृद्ध तर होईलच, परंतु त्याचबरोबर मराठी चित्रपट नाटक माध्यमातून नवीन पिढीला मराठी भाषेचे महत्त्व नक्कीच कळेल तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आबाळ वृद्धांची, सर्वांची लाडकी मराठी भाषाही पुढील हजारो वर्षे अशीच निरंतर राहू दे, आणि आपल्याला ज्ञानसमृद्धी देऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

लेखक:-अमोल मांढरे
        वाई,सातारा
मो:-7709246740

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब)
मो:-9404322931