




🔸स्वाभिमानी संघर्ष सेनेचे सिरसाळा सर्कल अध्यक्ष धर्मा मेंडके यांनी दिली माहिती
✒️आतुल बडे(परळी,विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405
सिरसाळा(दि.8सप्टेंबर):- सिरसाळा येथील गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या व ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शेख अब्दुला यांच्या तात्काळ बदलीच्या मागणी साठी स्वाभीमानी संघर्ष सेना व सिरसाळा ग्रामस्थ आक्रमक झाले असुन दिनांक १४ सप्टेंबर रोजी अमरण उपोषणास सिरसाळा ग्रामपंचायत समोर बसणार आहेत. अशी माहिती स्वाभीमानी संघर्ष सेनेचे सिरसाळा सर्कल अध्यक्ष धर्मा मेंडके यांनी दिली आहे.
गेल्या एक वर्षा पासुन सिरसाळा येथील गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामपंचायत, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या कडे सतत कायदेशीर मार्गाने मागणी केली पंरतु अद्याप अतिक्रमण हटवले नाही. रेणूका माता समस्त गावकरी, व सिरसाळा परिसरातील हिंदूचे अराध्य दैवत आहे. रेणूका माते बाबत भक्ती/ भावना ग्रामस्थांच्या आहेत. मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्याने हिंदू बांधवाच्या भावना दुखावत आहेत. ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने भावीक भक्तांच्या भावनांची अद्याप कदर केली नाही.
काही दिवसावंर नवरात्र सण आहे. यापुर्वी या ठिकाणी चे अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. तसेच अतिक्रमणा बाबत सिरसाळा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शेख अब्दुला यांनी दुटप्पीी व संशयास्पद भूमीका घेत अप्रत्यक्षपणे संबंधित अतिक्रमणास पाठराखण करत असल्याचे समजते आहे. म्हणून अतिक्रमण हटाव च्या मागणी बरोबर ग्रामसेवक शेख अब्दुला यांची देखील तात्काळ बदली करण्यात यावी अशा मागणी साठी स्वाभीमानी संघर्ष सेनेचे सिरसाळा सर्कल अध्यक्ष धर्मा मेंडके सह संघटनेचे अन्य सहकारी व ग्रामस्थ दिनांक १४ सप्टेंबर रोजी अमरण उपोषणास सिरसाळा ग्रामपंचायत समोर बसणार आहेत. या संदर्भातले निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिले आहे.




