नायगाव येथे दिव्यांगांची बैठक संपन्न

34

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.11सप्टेंबर):-10 सप्टेंबर 2020 रोजी प्रहार दिव्यांग संघटनेची मार्कंडेश्वर मंदिर नायगाव येथे बैठक संपन्न झाली या बैठकीच्या सुरूवातीलाच मुदखेड येथील अपघातात दुर्देवी मृत्यु पावलेले मुकबधीर दिव्यांग बांधव श्री दिगंबर आनंदा पवार यांना श्रधान्जली अर्पण करुन व एका मिनीटाचे मौन पाळून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गणेश पा. हंडे अजनीकर यांनी भुषवीले तर सुत्रसंचलनाची जबाबदारी चांदू आंबटवाड कुंटूरकर यांनी पार पाडली.श्रीयुत हंडे साहेबांनी आपल्या आक्रमक स्वभावाच्या भाषनात दिव्यांगां प्रती प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यावरून संताप व्यक्त केला 3% , 5% निधी, सं गां यो, मनरेगा, व अशा अनेक योजना दिव्यांगांच्या पर्यंत पोहचत नसल्यामुळे लवकरच तहसील कार्यालय व पंचायत समिति नायगाव च्या प्रांगणात उपोषनास बसण्याचा निर्धार करून दिव्यांगांना सुद्धा आपसा आपसातील मतभेद विसरून एकजुट राहण्याचा सल्ला दिला.

ह्या बैठकीस गणेश पा. हंडे ( प्रहार जन क्षक्ती पक्ष नांदेड) , मा. मारोती मंगरूळे ( प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जि. सचिव) , गोपीनाथ आंबटवार सांगविकर ( प्र. दि. सं. नां. कार्याध्यक्ष) ,मिलींद कागडे ( प्र. दि. नां उपाध्यक्ष) ,चांदू आंबटवाड ( नायगाव तालुका प्रतिनिधि पुरोगामी संदेश, दिव्यांग शक्ति पत्रकार), साईनाथ बोईनवाड ( नायगाव तालुका अध्यक्ष) , माधव जानोरे,एकनाथ संत्रे, बेलकर पा. बळेगाव, चंदर कामठे, मारोती गंगोत्री, शेख उस्मान, सुनील राठौड़, तुळशीराम गायकवाड, जयराम पा. वजीरगे व बहूसंख्य दिव्यांग हजर होते.