शेतकरी तूर पीक प्रशिक्षणाचे आयोजन

36

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.13सप्टेंबर): -भिलेगाव येथे राष्ट्रीय कडधान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत तुर पीक प्रशिक्षनाचे अयोजन करण्यात आले . सदर प्रशिक्षणास महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सागर विर्धे यांच्या शेतामध्ये तूर पिकावर आधारित मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले , तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी तूर पिकाच्या एकात्मिक किड व्यवस्थान व नियंत्रण या विषयी माहिती देताना शेतकर्यांनी कामगंध सापळे लावून त्याचे नियमित निरीक्षण करून किडिवर नियंत्रण मिळवण्यासाठी निम अर्क व योग्य औषधाची फवारणी करावी, उत्पादनातून मिळणाऱ्या तूर पिकाचे दाळी मधे रूपांतर करण्यासाठी दाळ मिल उभारावी ,महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी गटा मार्फत दाळ मिल निर्माण करून गावातच उद्योग उभारावेत . पुढे पर्यवेक्षक चंद्रकांत थोंटे यांनी शेतकऱ्यांना तूर पिकाचे व्यवस्थापन करताना तूर पिकाची शेंडे छाटणी उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे.

सर्व शेतकऱ्यांनी शेंडे छाटणी करावी , पाने गुंडाळणारी अळी यामुळे नियंत्रणात येते व झाडाची कायिक वाढ थांबून उत्पादनात भर पडते , महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतकरी कंपन्या गावातच स्थापन करून नवीन उद्योग उभारावेत . कार्यक्रमाला महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या , उपस्थित शेतकऱ्यांना कृषी दैनंदिनी चे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एम . बी . कवडे , कृषी सहायक वाय. एम. हाडबे , उपसरपंच बालाजी कडभाने ,सागर विरधे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुक्तेश्वर कडभाणे यांनी केले.