ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जानी) च्या सिद्धार्थ रामटेकेचा कोरोणाने मृत्यु

    54

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.13सप्टेंबर):- तालुक्यातील नांदगाव(जानी) येथील रहिवासी असलेले (60) वर्षीय सिद्धार्थ रामटेके यांचा दिनांक 08/09/2020 ला चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यु झाला. सिद्धार्थ रामटेके यांना निमोनिया झाल्याने त्यांना उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयच्या रुग्णालयात दिनांक 07/09/2020 ला करण्यात आले . यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी केली. चाचणीचा अहवाल पाजिटिव आल्याने त्यांची कोरोना बाधित रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली.

    चंद्रपुरातच महापालिकेच्या वतीने त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. सिद्धार्थ रामटेके यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलं व दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. नांदगाव जानी येथील बौध्द पंचकमेटीचे अध्यक्ष विनोद रामटेके यांच्या तर्फे सिद्धार्थ रामटेके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.