✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.14सप्टेंबर):-प्रहार जनशक्ती शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. महेश ठाकरे सर हिंगोली दौऱ्यावर आले असताना हिंगोली येथील सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कूल मधील प्रिन्सिपल यांनी चारशे विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुप मधून काढून टाकले आहे.

यासंदर्भात शाळेवरती रीतसर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देता वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख रवी उर्फ रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव, जीवन आडे, सुनील चव्हाण, मंगेश टिकारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED