माझा मराठवाडा

12

संस्कृतिची शान ही
कलेची खान ही
संतांची जन्म भूमी ही
माझा मराठवाडा

आज १७ सप्टेंबर आपल्या मराठवाड्यातील सर्व जनतेसाठी उगवलेला सुवर्ण दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपला एक मोठा सन , हाच तो दिवस १७ सप्टेंबर १९४८ साली आपन निजामशाही तून मुक्त होऊन आपल्या अखंडभारत देशात समील झालो १५ ऑगस्ट १९४७ नतंर संपूर्ण भारतात स्वातंत्र्य झाले , परंतु हैद्राबाद संस्थान नव्हते त्यातच निजामशाहीत आडकलेला आपला मराठवाडा  अखंड भारतातदेशात सामील नव्हता त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारवाई नुसार भारतीयलष्कर व निजामसेनात संघर्ष होऊन शेवटी निजाम १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी भारतीय सैन्याला शरणागत आला, आणि आपला मराठवाडा निजामशाही तून मुक्त झाला .
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनसाठी अनेकांचे योगादान लाभले .निजामाविरुद्ध संघटनात्मक व वैचारिक आव्हान स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिले. पुढे हा लढा गावोगावी घरोघरी पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे योद्धे उभे राहिले. पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव,श्रीनिवासराव बोरीकर, किशोरभाऊ शहाणे इत्यादी ह्या लढ्यात सामील झाले या लढ्यात स्त्रियाही देखील होत्या .करुनाबेन चौधरी , आशाताई वाघमारे, , सुशीलाबेन दिवान इत्यादी अनेक स्त्रीया या लढ्यात सामील होत्या .
आज आपला मराठवाडा सर्वांना प्रिय आहे मराठवाडा हा विविध बाबीनी संस्कृती कला परंपरा ने नटलेला आहे मंग ते कला साहीत्य पर्यटक संस्कृती , संप्रदाय , इत्यादी .मराठवाडा ही संतांची भूमी असं म्हणायला ही हरकत नाही .याच भूमीत संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई,संत मुक्ताई संत निवृत्ती महाराज , संत एकनाथ महाराज , समर्थ रामदास महाराज शिर्डीचे साईबाबा , संत भगवान बाबा इत्यादी अनेक थोर संत या भूमीत जन्मला आले .
संतांच्या पावन पद स्पर्शाने धन्य झालेली ही मराठवाडा भूमी आहे .मराठावाड्यातील धार्मिक स्थळे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आपेगाव, नांदेडचा सचखण्ड गुरुद्वारा संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसी नामदेव, संत जनाबाई चे जन्मगाव गंगाखेड, शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथरी, सन्त एकनाथांचे पैठण, समर्थ रा7मदासांचे जन्मगाव जाम्ब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, औण्ढा-नागनाथ, घृष्णेश्वर मन्दिर, शीख धर्मीयांचा नान्देड येथील सचखण्ड गुरुद्वारा , बीड येथील परळी वैजनाथ धार्मिक स्थळ , माहूर येथील
औण्ढा-नागनाथ , धर्मापुरी येथील – केदारेश्वर देवालय शिल्प स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना कल्हाली ता.कन्धार जि.नान्देड- ,ब्रह्मदेवाचे देवस्थान.
आजचा मराठावाडा मराठवाड्यातील प्रमूख शहरे तथा या विभागातील जिल्हे .मराठवाड्यात प्रामुख्याने आठ जिल्हाच्या समावेश आहे , मुख्य राजधानी औरंगाबाद , उस्मानाबाद, लातूर, बीड , परभणी , नांदेड , हिंगोली आणि जालना .यातील औरंगाबाद हे शहर लेणी , बीबीका मकाबरा इत्यादी मुळे एक पर्यटक स्थळ व औद्योगिक शहर म्हणुन ओळखल्या जाते.
बीड येथील परळी वैजनाथ हे खूप मोठे धामिर्क स्थळ आहे , येथीलच कंकालेश्वर ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मन्दिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.मन्दिराचे दगडी बान्धकाम आहे.अश्या अनेक धार्मिक संस्कृती , विविधतेने नटलेला आपला मराठवाडा आहे , सर्वांना मी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो , तसेच आपल्या हा सन कोरोना च्या सद्यस्थितीत वाढत्या प्रादुर्भावामुळे घरीच राहुन आनंदात साजरी करायचा आहे.

✒️लेखक:;अंगद दराडे
माजलगाव बीड
मो:-8668682620