जिल्हापरिषद हायस्कुल कुंटूर येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार संपन्न

28

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.17सप्टेंबर):-येथील जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये दि 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.सकाळी ठिक 08.05 वाजता शालेय प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक मा. संजयसिंग राजपूत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी ज्या ज्या थोर स्वातंत्र्य सेनानींनी बलिदान दिले व आपल्या जीवाचे रान केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री चंदर मोहनाजी देवगरेे आणि श्रीमती मालन बाई मोहनराव होळकर यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री बावणे सरांनी आपल्या सुमधुर आवाजात मराठवाडा गौरव गीत गायन केले व उपस्थितांत स्फूर्ती निर्माण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमाचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले.या प्रसंगी कुंटूर चे उपसरपंच मा. शिवाजीराव पा होळकर, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन मा. सूर्यकांत पा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष श्री लक्ष्मण पा आडकीने, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गंगाधरराव आडकीने, मुख्याध्यापक पाटील सर,ग्रामपंचायत सदस्य रज्जाक गुजीवाले, विनोद झुंजारे,सुरेश भोजराज, प्रतिष्ठीत नागरिक गणेशराव जाधव, गंगाधर पांचाळ,कदम पी एन, जेष्ठ पत्रकार संजय ठिकाणे पाटील आदी मान्यवर तसेच शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन श्री बी एम बावणे सर यांनी केले.