हर्ष पोद्दार यांच्या जागी बीडला नवे पोलीस अधीक्षक

18

✒️नवनाथ आडे(गेवराई, विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.18सप्टेंबर):-बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या जागी राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने त्यांच्या बदलीचे आदेश आज काढले. पोद्दार यांना सध्या कुठेच पदस्थापना देण्यात आली नसून त्यांचे आदेश स्वतंत्र काढले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

राज्याच्या गृहविभागाने 22 जणांना नव्या जबाबदार्‍या दिल्या आहेत. बीडचे मावळते पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा बीड जिल्ह्यातील कार्यकाळ ठिकठाक गेला आहे. मात्र अलिकडच्या काळात पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्यात बिनसल्याची चर्चा होती. यापुर्वीच कार्यारंभने त्यांची बदली होणार असल्याचे वृत्त दिले होते.
विशेष म्हणजे त्यांच्या जागी राजा रामास्वामी हे येणार असल्याचे म्हटले होते. आज हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.