🔷मुरमा खुर्द ता.घनासावंगी येथे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला सत्कार

🔷जनहित शेतकरी गटाचे अध्यक्ष यांचाही सत्कार

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.21सप्टेंबर):-दिनांक 18/09/2020 शुक्रवार रोजी घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथे रघुनाथ राधाकीसन मुकणे यांची सांस्कृतिक सेल भाजपा घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल व जनहित शेतकरी गटाचे अध्यक्ष यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, माजी आमदार विलास बापू खरात, भाजपा जालना जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, आ.नारायणजी कुचे,घनासावंगी भाजपा ता.अध्यक्ष शिवाजी दादा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक सेल भाजपा घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल रघुनाथजी मुकने यांच्या सत्कार समारंभ चे आयोजन ग्रामपंचायत मुरमा खुर्द च्या वतीने करण्यात आले होते.

मुरमा गावचे सरपंच शामनाना मुकणे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी जि प शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग चिमणे सर, संभाजी उढाण,दिनकर मुकणे,बिबीशन गपाट,शामराव पवार,बापुराव जाधवर, महेश शिंदे, योगेश ढोणे, शामराव मुकणे,मोहन मुकणे, विठ्ठलबाबा गिरी,अर्जून राठोड, यदामामा रोडे, अंगत सोळुंके, व गावकरी उपस्थित होते.तसेच त्यावेळी जनहित शेतकरी गटाचे सचिव महादेव पवार,कोषाध्यक्ष दत्तात्रय भानुसे, आत्माराम लिंगशे, रामनाथ पवार, ज्ञानेश्वर बागल, मच्छिंद्र थोरे,परमेश्वर चव्हाण, नाथा आढे,बळीनाना रोडे, सतीशराव जवरे, आप्पासाहेब मुकणे यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED