कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळ प्रकरणात चौकशी अंती प्राचार्य दोषी

    65

    ? स्थानिक तक्रार निवारण समिती गोंदियाचा निर्वाळा

    ✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    गोंदिया(दि.22 सप्टेंबर)-आमगाव तालुक्यातील भवभूती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एम. भुस्कुटे यांचे विरुध्द याच महाविद्यालयातील महिला ग्रंथपाल यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३ अंतर्गत जिल्हा महीला व बाल विकास स्थानिक तक्रार निवारण समिती गोंदिया येथे तक्रार दाखल केली होती.

    उपरोक्त कायदयाचे कलम ११ नुसार समितीने दाखल तक्रारीची चौकशी केली असुन त्यानुसार प्राचार्य यांचेवरील आरोप सिध्द होत आहेत असा निर्वाळा समितीने दिला आहे. समितीने निर्णय/ निकालांती सदर प्राचार्यावर विभागीय चौकशी करून शिस्तभंगांची कार्यवाही प्रस्तावित करावी. तसेच समितीने तयार केलेला चौकशी अहवालातील दंडात्मक शिफारशींची अंमलबजावणी करण्याकरीता सहसंचालक व कूलगूरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर व संबंधित संस्था संचालक मंडळ यांना पाठविला असून सदर कार्यवाही ६० दिवसांचे आत अंमलबजावणी करुन त्या बाबतचा अहवाल समितीस पाठवावा अशी विनंती सुद्धा समितीने सहसंचालकांकडे केली आहे.