रयत शेतकरी संघटना राज्य प्रवक्ते पदी शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे मांजरमकर यांची नियुक्ती

    54

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.23सप्टेंबर):-महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेली रयत शेतकरी संघटना एकमेव संघटना आहे शेतकऱ्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना प्रयत्न करीत आहे परंतु संघटनेचा कार्यकर्ता प्रमुख अशंता असतो कार्यकर्त्या शिवाय संघटना पुढे जाऊ शकत नाही जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सच्चा कार्यकर्ता संघटनेला पाहिजे असतो महाराष्ट्र राज्यात रयत शेतकरी संघटनेने आपल्या कामाचा प्रचंड दरारा निर्माण केला आहे.

    हा दरारा कायम राहून या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य व्हावे रयत शेतकरी संघटना घरा घरा पर्यंत पोहोचावी म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेतकरी पुत्र विश्वनाथ गोविंदराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.रविप्रकाश किशनराव देशमुख साहेब यांनी ही नियुक्ती केली आहे.सर्व सामान्य कुटुंबातील युवकाला ही संधी दिल्याबद्दल नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.