सत्यशोधक समाज ही व्यवस्थापरिवर्तनासाठी लढणारी पहिली संघटना – अॕड.अप्पाराव मैन्द

14

✒️पुसद(पूरोगामी संदेश नेटवर्क)

पुसद(दि.25सप्टेंबर)- धर्माच्या नावाखाली शूद्रातिशूद्राचे होणाऱ्या शोषणाविरूद्ध लढणारी म.फुले द्वारा स्थापित सत्यशोधक समाज ही पहिली संघटना आहे आणि म्हणून ती व्यवस्थापरिवर्तनाससाठी लढणा-या तमाम संघटनाची मातृसंस्था आहे.’ असे उद्गार सत्यशोधक समाजाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष अॕड आप्पाराव मैंन्द यांनी सत्यशोधक समाज वर्धापनदिन कार्यक्रमात काढले.ते दि.२४ सप्टेंबर २०२० रोजी चार्वाक वन ता.पुसद येथे आयोजित सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी से.नि.आध्यापक मा.नारायणराव क्षिरसागर होते.

व्यवस्थापरिवर्तनासाठी लढणा-या सामाजिक संस्थामध्ये भांडणे लाऊन आणि जुलमी व्यवस्था वेगळ्यारूपात परावर्तीत करून आजही प्रतिगामी शक्ती शुद्रातिशूद्राचे शोषण करीत आहेत.म्हणून त्यांच्याविरूद्ध सर्व व्यवस्थापरिवर्तनवादी संस्थानी एकत्रित लढणे अत्यंत जरूरीचे आहे. मा.डी.आर.शेळके, से.नि.जिल्हा आणि सत्र न्यायाधिश,औरंगाबाद यांचे नेतृत्वाखालील महाराष्ट्र सत्यशोधक समाजाने समन्वयस्काची भूमिका घ्यावी यासाठी मी प्रयत्न करीन. असे सांगून सत्यसोधक समाजाचे कार्य करण्यास कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे यावेळी आवाहन अॕड.अप्पाराव मैंद यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गोवर्धन मोहीते यांनी केले.अध्यापक यशवंतराव देशमुख ,से.नि .अध्यापक पी.बी.आणि संजय आसोले यांनी समयोचित भाषणे केलीत.

उपस्थिताचे आभार संजय आसोले यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास के.व्ही.मुनेश्वर,नानासाहेब तातेवार,सुधाकरराव चापके,वामनराव देशमुख,यशोधन क्षिरसागर ,यशवंत कांबळे ,ताहेरखान पठाण,प्रदीप तायडे,सुभाष दायमा आणि विश्वजित भगत उपस्थित होते.