मोटरसायकला दिली अज्ञात वाहनाने धडक

22

🔺मोटरसायकल स्वार जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.27सप्टेंबर):-राष्ट्रीय महामार्गावरुन जात असलेल्या दोन मोटरसायकल स्वारास अज्ञात वाहनाने धड़क दिल्याने मोटरसाइकलचालक जागीच ठार झाला तर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२६ रोजी मध्यरात्रीचे सुमारास घडली.

प्राप्त महितीनुसार शहरातील दोन युवक मध्यरात्रीचे सुमारास आपल्या बजाज डिस्कवर क्र.एमएच ३२-ऐ एम ३४३९ या दुचाकी वाहनाने राष्ट्रीय महामार्गावरिल पुलावरुन जात होते,याचवेळी समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांचे वाहनास धड़क दिल्याने अपघात होऊन मोटरसाइकल चालक राजू दिनकर म्याने(३८)हा जागीच ठार झाला. तर मागे बसलेला युवक चेतन विजय हिंगणे(३५) हा गंभीर जखमी झाला.

मृतक तसेच त्याचा मित्र हे दोघेही शहरातील राममंदिर वार्ड येथील रहिवासी आहेत.मृतक राजू म्याने हा अविवाहित युवक असून त्याचे आईवडील,भावासह राहतो तर त्याचा मित्र चेतन हा विवाहित असून त्याची पत्नी व मुलगा चंद्रपुर येथे वास्तव्यास आहेत.चेतन हा ट्रकड्राइवर आहे.
काल गंभीर जखमी झाल्यानंतर चेतन यास उपजिल्हा रुग्णालयात पाठविन्यात आले.

तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.