टिप्परने धड़क दिल्याने कारची तोड़फोड़

8

🔺सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.27सप्टेंबर):-स्थानिक प्रज्ञानगर येथील रहिवासी रजत प्रकाश भगत हे आपल्या बहिनीसह राष्ट्रीय महामार्गावरिल सर्विस रोडवरुन कारने जात असतांना एका टिप्परने धड़क दिल्याने कारची तोड़फोड़ झाल्याची घटना आज सकाळी घडली.सदर घटना रिमडोह शिवारात घडली.

आज सकाळी श्री भगत हे आपल्या बहिनीस मोटरड्राइविंग प्रशिक्षणासाठी रिमडोह परिसरात घेऊन गेले होते,तेथून परत येत असतांना पाठिमागुन वेगाने येणाऱ्या संदीप कंस्ट्रक्शन कंपनीच्या टिप्पर क्र. एम एच ३२-क्यू ०४६८ याने मारोतीसुजकी बेलोनो कार ला जोरदार धड़क दिली.त्यात कारचे सुमारे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेनंतर फिर्यादिचे तक्रारीवरुन टिप्परचालक बबन राऊत(५५) रा.संत गोमाजी वार्ड,हिंगणघाट याचे विरुद्ध विविध कलमाअन्वये शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून वाहतुक पोलिस हवालदार नितीन राजपुत हे पुढील तपास करीत आहेत.