बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जयंतीप्रित्यर्थ रिपब्लिकन पक्ष व संलग्नित संघटनांद्वारे कामगार वर्गात मास्कचे वाटप

28

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.28सप्टेंबर):-रिपब्लिकन पक्षाशी बांधिलकी असलेली ट्रेड युनियन, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन व त्यासी संलग्नित रिपब्लिकन मजूर संघटना व रिपब्लिकन पक्षाची आघाडीची फौज असलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे रिपब्लिकन पक्षाचे कालकथित नेते, राज्यसभेचे माजी उपसभापती स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन, मेजर गेट समोर, उर्जानगर दुर्गापूर येथे सिटीपीएस मध्ये काम करणाऱ्या कामगारांना, मानवी जीवनावर ओढवलेले जागतिक संकट-कोरोनापासून प्रतिबंध करण्यासाठी आज दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी मास्कचे वितरण करण्यात आले.

सोबतच कामगार वर्गाच्या उद्धारास्तव, रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केलेली मानव मुक्तीची तत्वे नमूद असलेले पत्रकही याप्रसंगी वितरित करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संयोजक तसेच रिपब्लिकन मजुर संघटनेचे अध्यक्ष आयु. शार्दूल गणवीर, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आयु. राजकुमार जवादे, सल्लागार आयु. सुभाष मेश्राम, सचिव आयु. राकेश कालेश्वर, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन- विदर्भ प्रदेश अध्यक्ष आयु. विजय शिडाम, चंद्रपूर जिल्हा बिईएफचे सल्लागार नवनाथ देरकर तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.