प्रहार संघटनेच्या वतीने पुकारलेले एक दिवसीय उपोषण संपन्न

38

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.29सप्टेंबर):-दिनांक 28 सप्टेंबर रोजी पंचायत समिती नायगाव येथे दिव्यांगाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसंदर्भात सत्याग्रह उपोषणाचे अनोखे आंदोलन मा. राज्यमंत्री ना बच्चू कडू यांच्या प्रेरणेने व नांदेड जिल्हा प्रमुख मा विठ्ठल रावजी मंगनाळे साहेब यांच्या निर्देशानुसार, नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी लॉकडाउन सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन केले होत.

या आंदोलनात पंचायत समिती सभापती सौ प्रभावती विठ्ठल कचरे यांचे प्रतिनिधी यांनी पंचायत समितीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या चार मागण्या मान्य करून यानंतर दिव्यांगांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नसल्याचे सांगितले व नवनिर्वाचित गटविकास अधिकारी फंदेवाड साहेब यांनी आंदोलन न करता दिव्यांग यांनी प्रतिनिधिक स्वरुपात दिव्यांगांच्या अडचणी व प्रश्न संदर्भात कम्युनिकेशनची वाढ करण्यास सांगितल.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून पुरोगामी संदेश महाराष्ट्र व दिव्यांग शक्ती नायगाव तालुका प्रतिनिधी श्री चांदु आंबटवाड यांना प्रहार दिव्यांग संघटना नांदेड चे जिल्हा सहसचिव पद मंगनाळे साहेब व पंढरीनाथ हुंडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. व चांदु आंबट-वाड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानून वंचित उपेक्षित दिव्यांगाना प्रहार संघटनेच्या माध्यमातून नक्कीच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनास तालुक्यातील शेकडो दिव्यांग व इतरही संघटनेचे पदाधिकारी हजर होते त्यात प्रामुख्याने प्रहार दिव्यांग संघटना नांदेड जिल्हाप्रमुख विठ्ठल रावजी मंगनाळे साहेब, नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तरचे पंढरीनाथ हुंडेकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री गणेश पाटील हांडे अजनी कर, नांदेड जिल्हा सचिव श्री मारुती मंगरुळे साहेब, कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे, नांदेड जिल्हा सहसचिव (नवनिर्वाचित)चांदु आंबटवाड, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद काकडे, मुदखेड तालुका अध्यक्ष अनिल पाटील शेटे, मुखेड तालुका सचिव साहेबराव निवडंगे, मुखेडचे महिला तालुका अध्यक्ष राजश्री गवलवाड मॅडम, मुखेड पुरुष नारायण शाहू महाराज, बाराळी सर्कल उपाध्यक्ष अंजन पुंडा सोलेवाड मांजरी मॅडम, माधव बोईनवाड कंधार, विठ्ठल कदम हिप्परगे कर प्रहार जनशक्ती पक्ष नायगाव तालुका अध्यक्ष, युवा अध्यक्ष मारुती पाटील ईकळीमाळ, सचिव गणेश पिंपळे, दिगंबर मुदखेडे, मैनोद्दीन शेख, गोविंद होळकर, मल्हारी महादाळे, सुनील राठोड, एकनाथ संत्रे, माधव कोसंबे, भगवान जकापुरे, राजू इरेवाढ, लक्ष्मण रेपणवाड, व इतर असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.