🔸कार्यकाळ संपुष्टात आलेल्या सरपंचांचा जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्यातर्फे सत्कार

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.30सप्टेंबर):- तालुक्यातील पारडी-मिंडाळा- बाळापुर जि.प.क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींना या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी जिल्हा निधीतुन मंजुर केलेल्या ट्राँली स्पिकर बाँक्स चे वितरण नुकतेच करण्यात आले.

जि.प.क्षेत्रात विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या विविध खात्यामार्फत कोट्यावधी रुपयांची विकास कामे संजय गजपुरे यांनी खेचुन आणली असुन सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. मिळालेल्या जिल्हा निधीतुन त्यांनी क्षेत्रातील कोर्धा, पारडी(ठवरे), कोसंबी गवळी, नवेगाव पांडव, मिंथुर, मिंडाळा, वासाळामेंढा, किटाडीमेंढा, बोंड, नवेगाव हुंडेश्वरी, देवपायली, बाळापुर(बु.), आकापुर, गंगासागर हेटी व चिंधी चक या ग्रामपंचायत साठी ट्राँली स्पिकर बाँक्स मंजुर केले. या सर्व ग्रामपंचायतींना कोरोना महामारीच्या प्रारंभीक काळात गावात मुनादी देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी मेगाफोन चे वितरण केले होते. त्यावेळी सर्वच सरपंचांनी ग्रामसभा व इतर कार्यक्रमासाठी स्पिकर बाँक्स ची मागणी केली होती.

जिल्हा निधीतुन या मागणीची पुर्तता संजय गजपुरे यांनी काही कालावधीतच करीत दिलेला शब्द पुर्ण केला. हा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले व गटनेते तथा माजी जि.प.अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचे आभार मानले आहे. या ट्राँली स्पिकर बाँक्स चे वितरण प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. निधीचा वापर योग्य कामासाठी होत असल्याबाबत सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी पाच वर्षे पुर्ण होऊन कार्यकाळ संपुष्टात आलेल्या कोर्धा,पारडी(ठवरे),कोसंबी गवळी,मिंडाळा,बोंड,नवेगाव हुंडेश्वरी,देवपायली,बाळापुर(बु.),आकापुर व चिंधीचक या १० ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा भेटवस्तु देऊन संजय गजपुरे यांनी सत्कार केला. याप्रसंगी पं.स.सदस्य संतोष रडके, कृऊबास संचालक धनराज ढोक , भाजपा जि.प.सर्कल प्रमुख धनराज बावणकर, मच्छिंद्र चन्नोडे,राजुभाऊ गुरपुडे,रतिराम ठवरे, विनोद हजारे, शंकर मेश्राम,भोजराज नवघडे , कैलास अमृतकर , श्रीमती निताताई बोरकर, नितेश कुर्झेकर , मोरेश्वर निकुरे, मनोज कोहाट, सचिन चिलबुले यांच्यासह सर्व ग्रामसेवक , प्रशासक व ग्रा.पं.सदस्यांची उपस्थिती होती .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED