
🔹आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा
🔸लवकरच प्रश्न मार्गी लागणार
✒️भामरागड(पुरोगामी संदेश नेटवर्क)
भामरागड(दि.2ऑक्टोबर):- येथील पर्लकोटा नदीवर पावसाळ्यात वारंवार पुलावरून पाणी वाहत असते परिणामी भामरागड वासीयांचे जगाशी नेहमी संपर्क तुटत असतो त्यामुळे नवीन पुलाची निर्मिती व त्याच रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्रारंभ झाले असून दुकानदार व व्यापाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आले असून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून दुकानदारांचे नुकसान भरपाई आणि पुनर्वसन करण्यासंबंधीची मागणी केले आहे.
भामरागड येथील दुकानदार व व्यापारी वेळोवेळी नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे लावून धरत होते त्या अनुषंगाने आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून लवकरच समस्या मार्गी लागणार असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.
पर्लकोटा व पामुलगौतम नदीवरील नवीन पूल आणि आलापल्ली-भामरागड-नारायणपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची सुरुवात झाल्याने मागील अनेक वर्षांपासूनची समस्या सुटणार असून आता केवळ दुकानदार व व्यापाऱ्यांचा मोठा प्रश्न असून लवकरच नुकसान भरपाई देऊन पुनर्वसन केले की भामरागड वासीयांचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले आहे.