स्वच्छ भारत सेवा सप्ताह ला उत्तम प्रतिसाद

    40

    ✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

    सातारा(दि.2ऑक्टोबर):- स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०१४(१४५ व्या) गांधी जयंती निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली होती.आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सातारा व लायन्स क्लब ऑफ सातारा अजिंक्य यांचे संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.

    ‘स्वच्छ भारत अभियान’ म्हणून श्रमदानातून चारभिंती परीसरात कचरा गोळाकरून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या वेळी लायन्स क्लब ऑफ सातारा अजिंक्यचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब सावंत इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक सारिका भोसले आणि विद्यार्थी उपस्थित होते.स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधीजींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे,असेही यावेळी बोलताना डॉ सावंत यांनी आवाहन केले.