परभणी, हिंगोली जिल्ह्यात काढलेले सोयाबीन पीक पाण्यात

62

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.3ऑक्टोबर):-दोन, तीन दिवासांच्या उघडीपीनंतर शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये कापणी करुन ठेवलेले सोयाबीन पाण्यात बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांतील सोयाबीनचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. त्यातच सततच्या पावसात ते भिजल्याने शेंगाना झाडावरच मोड फुटले. त्यामुळे दाण्यांची प्रत खराब झाली. गेल्या दोन, तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सोयाबीन काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु, मजुरांच्या समस्येमुळे अनेक शेतकऱ्यांना कापणी केलेले सोयाबीन जमा करता आले नाही.

बुधवारच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापणी केलेल्या सोयाबीनच्या शेताला तळ्याचे स्वरुप आले होते. पीक पाण्यात बुडल्याने खूप मोठे नुकसान झाले.