हाथरस येथील घटनेचा निषेध, कैंडल मार्च आयोजन

  44

  ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

  ब्रम्हपुरी(दि.4ऑक्टोबर):- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणींवरअत्याचार व हत्या प्रकरणाचा ब्रम्हपुरी येथील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष तर्फे निषेध करून सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन महामहीम राष्ट्रपती,पंतप्रधान यांना मा.उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.

  उत्तर प्रदेशातील हातरस येथिल मनीषा वाल्मिकी या १९ वर्षीय दलित तरुणीवर चार नराधमाने सामूहिक अत्याचार करून पाठीचा कणा मोडला .उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.तिच्यावर अंत्यसंस्कार रात्री करून कुटूंबातील व्यक्तीला दाखवले नाही त्यामुळे उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला असून तिथे महिला व युवती सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे .

  सदर प्रकरणाचा जलद गती न्यायालयात निकाली काढून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी ब्रम्हपुरी तील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांच्या वतीने कैंडल मार्च आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे पीडित युतीला श्रद्धांजली अर्पण करून कैंडल मार्च काढण्यात आला.

  आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,योगी सरकार चा निषेध ,मनीषा वाल्मीकि अमर रहे अशा घोषणा देत क्रिस्थानंद चौक ,शिवाजी चौकातुन रैली जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , येथे कैंडल मार्च समाप्त करुन मा.गोविंदराव भेंडार कर यांच्या अध्यक्षतेखाली मनीषा वाल्मिकी ला श्रद्धांजली तसेच शोकसभा घेण्यात आली. यावेळेस डॉ देवेश कांबळे ,जीवन बागड़े, डॉ. राजेश कांबळे, प्रा. संतोष रामटेके, प्रा. नुरुल अंसारी, डॉ. प्रेमलाल मेश्राम, नेताजी मेश्राम, प्रशांत डांगे, पद्माकर रामटेके, विजय रामटेके,मिलिंद मेश्राम, विजय पाटिल, लीना रामटेके, विद्या सुखदेवे, प्रमोद मोटघरे, नरेश रामटेके ,हरिदासबाबू लाडे, दिपंकर कांबळे, लीलाधर वंजारी,,राहुल सोनटक्के तसेच एस सी, एस टी, ओबोसी ,समाजबांधव सामाजिक अंतर ठेऊन, मॉस लावून मोठ्या संख्येने उपस्थित होते.घटनेचा निषेध करित पीड़ित युवतीच्या मारेकऱ्याना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन मोठ्याप्रमात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.