हाथरसची घटना मानवतेला काळीमा फासणारी

  46

  🔸बेरोजगार भूमिहीन मजूर असंघटित कामगार संघाने सादर केले निवेदन

  ✒️दोंडाईचा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  दोंडाईचा(दि.5ऑक्टोबर):-हाथरस (उत्तर प्रदेश) येथील मनिषा वाल्मीकी या दलीत तरुणीवर झालेल्या पाशवी बलात्कारा व हत्येच्या जाहिर निषेध करण्याचे निवेदन अप्पर नायब तहसिलदार दोंडाईचा यांना निवेदन देण्यात आले.

  बेरोजगार भुमिहीन मजुर व असंघटीत कामगार संघा कडुन जाहिर निषेध करण्यात आला असून या प्रकनातील दोषींना फाशीची शिक्षा होणे बाबत निवेदनात उल्लेख केला आहे.

  बेरोजगार भुमिहीन मजुर व असंघटीत कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष .संजय रणदिवे.यांच्या मार्गदर्शनाखाली. सुशिक्षित बेरोजगार युवा संघाचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष नवनीत बागले.शिंदखेडा तालुका अध्यक्ष.राजेंद्र चौधरी.दोंडाईचा शहर अध्यक्ष.सचिन नगराळे.व स्वाभिमान शेतकरी संघटने धुळे जिल्हा अध्यक्ष विकास पाटील .अखिल भारतीय सरपंच परिषदचे शिंदखेडा ता.अध्यक्षदिनेश बेडसे.राहुल पाटील.संदिप पाटील सुदाम तिरमले आदि उपस्थित होते.