🔸उत्तर प्रदेश मध्ये जातीय अत्याचार घटनेत वाढ

🔹जिल्हाधिकारी (सातारा) यांना निवेदन सादर

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.7ऑक्टोबर):-उतर प्रदेशातील मनिषा वाल्मिक नामक तरूनीवर पाच नराधमांनी गॅगरेप करून अतिराय क्रूरपणे तिची हत्या केली . या अमानवीय घटनेचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तिव्र शब्दात निषेध करणारे निवेदन सादर करण्यात आले.

योगी सरकारच्या कार्यकाळात दलितांवर होणाऱ्या प्रचंड अत्याचार निषेध करून योगी सरकार बरखास्त करण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली.जनतेच्या तीव्र भावना केंद्रसरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी मागणी करत आहोत.आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा करून कठोर कारवाई करावी असे निवेदनातून जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सांगितले आहे.

अत्याचार प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा सुनावली जावी,अन्यथा जनतेच्या सहकार्याने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विजयकुमार भास्कर (प्रभारी सातारा अनुसूचित जाती विभाग जिल्हा काँग्रेस ) , मनोजकुमार तापसे(अध्यक्ष, सातारा जिल्ह्या काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभाग) यांनी दिली.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED