केंद्रीय पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष कु.किरण जाधव “कसं डिंपल पडतंय गालावरी” या गाण्यामध्ये मुख्य भूमिकेत

32

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदनगर(दि.18ऑक्टोबर):-पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावाजलेले नाव म्हणजे कु.किरण जाधव,यांचे पाहिले अल्बम साँग १६/१०/२०२० ला रिलीज झाले.प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याशी बोलताना अभिनेत्री कु.किरण जाधव यांनी सांगितले की, गाण्याची शूटिंग अहमदनगर जिल्यातील राहुरी मुळा डॅम येथे झालेली असून,शूटिंग चा कालावधी फक्त ६ ते ७ तासांचा होता.

कु.किरण जाधव या अभिनेत्री आणि अक्षय वेताळ हे अभिनेता मुख्यभूमिकेत दिसत आहेत.श्री.भाऊसाहेब शिंदे (गाव माझा न्यूज गृहविभाग प्रमुख,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य) यांचे शूटिंग साठी विशेष सहकार्य लाभले.दिग्दर्शक : दिलीप साळवे, सुनील काटे, प्रमुख व्यवस्थापक : गौरव बोरकर,स्वप्नील बोरकर,दिपमाला जाधव, साई रणधीर, शिर्डी शहर अध्यक्ष :आकाश भाऊ जाधव, साहिल जाधव, शूटिंग वेळी उपस्थित होते.प्रेक्षकांनी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद नोंदवला आहे.

कु.किरण जाधव यांचे त्यांच्या सहकाऱ्यांन मार्फत कौतुक होत आहे.तसेच न्यूज मीडिया माध्यमातून कु.किरण जाधव आणि अभिनेता अक्षय वेताळ यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!