MPSC च्या विद्यार्थ्यांना चिड का येत नसेल?

27

विद्यार्थांचा अभ्यास झाला नाही म्हणून MPSC च्या परिक्षा लांबणीवर टाकल्याचे कारण सांगण्यात आले आहे. MPSC च्या परिक्षा समोर ढकल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक तर झालीच शिवाय अनेक विद्यार्थ्यांची समोरील संधी सुद्धा जाऊन इतक्या दिवसात केलेली मेहणत वाया जाणार असुन हजारो तरुण तरुणी पुन्हा बेरोजगार म्हणून समाजात येणार आहेत.

MPSC सारख्या परिक्षेमधून अधिकारी होऊन जनहीताची सामाजिक व्यवस्था निर्माण करून जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी अधिकारी वर्गावर येत असते. उद्या अधिकारी होऊन समाज हिताचे कामे करण्याचे स्वप्न बघणारे अधिकारी लोकच आज समस्या ग्रस्त आहेत. आणि विषेश म्हणजे उद्याचे अधिकारी आज समस्या समस्या ग्रस्त असताना व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्वतः ला न्याय मिळाला म्हणून कोणीच पाहिजे तसे समोर येताना दिसत नाही.

सदर परिक्षा समोर ढकल्यामुळे अनेक तरुण पुढच्या येणाऱ्या दुसऱ्या परिक्षेमधून वयामुळे बाहेर पडतील. नियोजना नुसार परिक्षा झाली असती तर पुढील परिक्षेचे वेळापत्रक नियोजना नुसार ठरले असते. परंतु नियोजित परिक्षाच वेळेवर होणार नसेल तर पुढील वेळापत्रक वेळेवर येऊन वयाच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल याची शाश्वती नाही. विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही असे जर आयोगाचे म्हणणे असेल, आयोग परिक्षा विद्यार्थ्यांच्या अभ्यासानुसार घेते कि वेळापत्रका नुसार? विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही तर कधी होणार अभ्यास याचे स्पष्टीकरण मात्र दिलेले नाही.

अभ्यास झाला नाही म्हणून परिक्षा समोर ढकलाव्या अशा प्रकारचे किती मेल विद्यार्थ्यांनी आयोगाला केले? कोरोनामुळे वाढलेली प्रचंड बेरोजगारी, सोबत वाढलेली महागाई यावर मात करून घरात खायला नसले तरी परिक्षेसाठी शहरात येऊन खाणावळ, राहण्यासाठी खोल्या घेऊन ग्रामीण भागातील गरिब, होतकरू तरुण तरुणी परिक्षेसाठी सज्ज असताना एकदम परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे म्हणजे गरिब होतकरू विद्यार्थ्यांच्या जिवनाशी खेळणे होय.

नाजूक परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन, अनेक गोष्टींशी तडजोड करून, झेपत नसले तरी शहरात भाड्याने खोली करून, मित्र मैत्रिणीच्या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करून, एकवेळ उपाशी राहुन अधिकारी होण्याची स्वप्न बघणाऱ्या आहे ते पुर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून मेहणत करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षा समोर ढकलल्याणे मोठ्या संकटात टाकले आहे.

जनतेच्या समस्या सोडविण्या अगोदरच स्वतः समस्या ग्रस्त झालेला आजचा युवा वर्ग स्वतः च्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवून स्वतः ला न्याय मिळवू शकत नसेल तर उद्या अधिकारी झाल्यावर जनतेने न्यायाची अपेक्षा करावी कि नाही हाच प्रश्न आहे.आयोगाच्या वेळापत्रकानुसार लाखो तरूण तरुणींनी परिक्षेची पुर्ण तयारी केलेली असताना परिक्षेच्या दोन तिन दिवस अगोदर सरकारला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता कशी काय निर्माण झाली या प्रश्नाचे उत्तर आजही कळेनासे झाले आहे.

आज पर्यंत कोणाचाच विचार न करता जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या सरकारने याच वेळेस विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणे यात नवल नसावे का? खरं तर विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही हे तर फक्त कारण आहे. कारण निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा नसुन विरोधातच आहे याची जाणीव उद्याचे अधिकारी बनणाऱ्या विद्यार्थ्यांना, तरुण तरुणींना नाही याची खंत वाटते. MPSC नियोजित परिक्षा लांबणीवर टाकून विद्यापिठ स्तरीय परिक्षा घेण्यासाठी सरकार सज्ज होते मग MPSC साठी ती तत्परता सरकार का दाखवत नसेल?

विद्यापीठाच्या परिक्षेसाठी अतिरिक्त खर्च, ऑनलाइन परिक्षा, नवीन नियम बनवून वेळापत्रक जाहीर केले. मग बनवलेले वेळापत्रक बदलून विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यापासून दुर ठेवणे याला काय म्हणावे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळं घडताना उद्याचा अधिकारी आजच्या व्यवस्थेला प्रश्न न विचारता गप्प बसतो. हे गप्प बसण्यामागचे नेमके कारण आहे तरी काय. अधिकारी होण्याचे मोठमोठे स्वप्न बघुन, अहोरात्र मेहनत करणारे तरुण जर स्वतः चे नुकसान होताना गप्प बसले तर याला शिक्षण म्हणावे का? शिक्षणाने माणसाची बुद्धी चौकस होते, तर्कसंगत विचार करायला सुरवात होते, सत्य असत्यामधिल फरक कळतो.

असे असताना उद्याचेअधिकारी गप्प बसलेले आहेत याचा अर्थ स्वतः वर होत असलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव नाही, नाही तर स्वतः वरील अन्याय दुर करण्याची क्षमता नाही. साधा विचार केला तर लक्षात येईल २०२० ची परिक्षाच समोर ढकल्यामुळे कितीतरी तरुण तरुणी वयामुळे बाद होतील. पुढे येणारी एक दोन संधी यामुळे नक्कीच त्यांच्या हातून जाणार आहे. अहोरात्र अभ्यास करून, मेहनत करून, कुठे तरी अर्धवेळ काम करून, मजूरी करून, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे तरुण तरुणी आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत. या तरुण तरुणींचा विचार सरकारने तर केला नाहीच पण विद्यार्थी सुद्धा गप्प आहेत. याचा अर्थ असाच आहे की सरकार म्हणते अभ्यास झाला नाही. आणि परिक्षा देणाऱ्यांना ते मान्य आहे.

परिक्षा समोर ढकलल्यामुळे अनेक तरूण तरुणींनी यांनी आता आयोगाची तयारी करायचीच नाही असा निर्णय घेतला, अनेक तरुण तरुणी अर्धवेळ काम करून उदरनिर्वाह सह आपली तयारी करायचे असे आता मिळेल ते पुर्ण वेळ कामाच्या शोधत आहेत. फक्त परिक्षेची वाट बघून जमत नाही तर पोटाची खळगी भरण्यासाठी काही तरी काम करावे लागते. MPSC चा उमेदवार सर्व गोष्टी निमुटपणे सहन करत आहे पण व्यलस्थेला प्रश्न विचारून स्वतः ला न्याय मिळवून देऊ शकत नाही.

खरचं एवढे चुकीचे होताना, लाखो तरुणांच्या पोटाचा प्रश्न असतात, ते तरुण कशापद्धतीने तडजोड करून परिक्षा अर्ज भरण्यापासुन तर पुस्तके विकत घेणे, परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी केलेली तयारी, यासाठी काय काय करावं लागते हे फक्त त्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना माहिती असते, परिक्षेचा स्वतः ला खुप मोठा फटका बसलेला असताना विद्यार्थ्यांना चिड का येत नसेल. व्यवस्थेच्या पुढे खरचं तरुण हतबल झाला का? व्यवस्थेच्या विरोधात तरुणांची बंड करण्याची हिम्मत नाही यावर सुद्धा चर्चा, विचार विनीमय होणे गरजेचे आहे. सध्या MPSC च्या उमेदवारांना समोर खुप मोठी समस्या आहे.

अनेकांना आपले भविष्य अंधकारमय झाले याची जाणीव आहे, तरी हे उमेदवार एकत्र येऊन किमान आयोगाला प्रश्न विचारण्याची हिम्मत करत नाहीत, कदाचित उमेदवारांच्या काही कमतरतेमुळेच व्यवस्थेचा आयोग MPSC ची परिक्षा न घेता उमेदवारांचीच परिक्षा घेत आहे. आजच्या तरुणांचे शांत बसणे कदाचित उद्याच्या पिढीचा आवाज बंद करू शकतो, आज चे व्यवस्थेच्या विरोधात बोलणे कदाचित उद्याचे परिवर्तनाचे किरण असु शकते. पण हे नेमके करायचे कोणी? ज्याचे घर गळत आहे, जळत आहे, अंधारात आहे.

त्यांना जर त्या संकटापासून वाचवण्यासाठी चे उपाय माहिती नसतील तर एक वेळ संकटातून निर्माण होणारे नुकसान मान्य करू पण उपाय माहिती असतात संकटातून बाहेर येत नसु तर हा स्वतः चा च आळस आहे असे म्हणावे लागेल, आळशी माणसे बोलु शकत नाहीत, आळशी माणसाला चिड येत नाही. परंतु आयोगाची परिक्षा देणारे सर्वच उमेदवार आळशी आहेत असं नाही पण सक्रीय उमेदवार नेमके कुठे आहेत, आणी स्वतः चे घर उध्वस्त होताना त्यांना चिड का येत नसेल याचा विचार करणेही गरजेचे आहे.

युवक हाच देशाचा आधार स्तंभ आहे, आणि आधारस्तंभच वेगवेगळ्या समस्येने डगमळीस आलेला असल्याने देशाची परिस्थिती मोडकळीस आली तरी आपले लक्ष नाही, कारण फक्त जाणीव आपल्याला देशाची, देशातील तरुणांची जाणीव नाही.
*************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००