‘नीट’ च्या परीक्षेत वैभव ढाकणे’चे यश

31

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-909604040

बीड(दि.18ऑक्टोबर):- देशातून एम.बी.बी.एस’साठी असंख्य विद्यार्थांनी परीक्षा दिली. अतिशय कठिण आभ्यासकरुन एम. बी. बी. एस. व एम. डी. होण्याकरिता राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा ‘नीट’ 2020 च्या निकालात नुकताच जाहीर झाले.

या परीक्षेत परळी तालूकातील ग्रामीण भागातून शैक्षणिक क्षैञामध्ये ‘वैभव विष्णू ढाकणे’ यांनी 720 पैकी 664 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. यशासह तो ऑल इंडिया रँक मध्ये 1831 वा तर ओबीसी ऑल इंडिया रँक मध्ये ये 562 व आला आहे.

परळी तालूकातील आस्वलांबा या गावातील वैभव विष्णू ढाकणे याचे शिक्षण विद्यावर्धिनी विद्यालय पूर्ण झाले असून राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेज लातूर येथे पूर्ण केलेआहे. डॉ.वाल्मीक मुंडे, डॉ.शशिकांत कराड, डॉ. जगदीश प्रसाद देशपांडे (बालरोगतज्ज्ञ) प्रा. संजय आघाव, विजय आघाव, श्याम आघाव, माणिक मुंडे, पद्माकर आंधळे, दौलतराव ढाकणे, अंगद ढाकणे, सूर्यकांत काचगुंडे, संजय काचगुंडे, शेरकर सर, जि. प. वानटाकळीचे मुख्याध्यापक कवडेवार सर, वानटाकळीचे सरपंच विष्णू हंगे, संतोष मुंडे, मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रदीप गित्ते, व्यंकट सोनपीर,कौठळीच्या तलाठी भाग्यश्री गित्ते,सई गित्ते, शुभम आघाव, सनतकुमार आघाव, भागवत ढाकणे, प.पू.माधव महाराज ढाकणे, पालक विष्णू ढाकणे व वैभव ढाकणेच्या सर्व कुटुंबीयांनी त्याचे अभिनंदन केले आहे.