सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपंग दाखले मिळणार

36

🔸आमदार प्रणिती शिंदे यांनी केला मा. सार्वजनिक आरोग्यमंत्री यांना फोन

🔹यानंतर अपंग दाखला देण्याचे मिळाले प्रशासनाला आदेश

✒️सोलापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सोलापूर(दि.21ऑक्टोबर):- संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठया प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात अपंग दाखला देण्याचे बंद करण्यात आले होते ते आजपर्यंत बंद आहे.

यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी, नागरीक व ज्येष्ठ नागरीकांना अनेक अडचणी निर्माण होत आहे. नागरीकांकडे अपंग दाखला नसल्यामुळे त्यांना कोणतेही स्पर्धा परिक्षा व इतर सोयी-सुविधांचा लाभ घेता येत नाही. याबाबत नागरीकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती.

यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे साहेब यांना फोनवर सविस्तर माहिती दिली. मा. सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालयात अपंग दाखला देण्याचे आदेश दिले.