एकच व्यक्ती दोन नावाने शासनाची करतो लूट- आसाराम नावाने नौकरी तर अशोक नावाने राशन दुकान

33

🔸तीन महिन्याचे जनतेचे राशन विकले काळ्याबाकजारात

🔹अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्रीकडे केली मागणी

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405

अंबेजोगाई (21 ऑक्टोबर )-शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी ता.पाथरी जि. परभणी येथे कार्यरत सेवक अशोक सोपान नखाते यांनी आसाराम सोपान नखाते या खोट्या नावाने टीसी व जन्म प्रमाणपत्र व इतर खोटे कदपत्रे तयार करून संबंधित शाळेत नौकरी मिळवून लाखो रुपये पगार शासनाची प्राप्त करून शासनाची फसवणूक मोठा भ्रष्टाचार केला आहे तसेच सदर सेवक शाळेत वेळेवर ड्यूटी न करता रेशन दुकानावर व्यापार करतो शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक नातलग असल्याने संगणमत करून हजेरीपटावर खोटी सही करून पगार घेऊन शासनाची फसवणूक व मोठा भ्रष्टाचार केला आहे.

सदर व्यक्तीचा रेशन दुकान असून सन 2018 मध्ये फरवरी, मार्च, एप्रिल महिन्याचे गहु, तांदूळ, साखर शासनाकडून एकूण 523.14 क्विंटल प्राप्त करून हदगाव व जवळा झुट्टा रेशन कार्डधारकांना वाटप न करता काळ्याबाजारात विक्री करून गोरगरीब जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे व मोठा भ्रष्टाचार केला आहे.

त्यामुळे सदरील व्यक्तीची सीबीआय व सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व अशोक सोपान नखाते यांच्या वर FIR नोंद करून व्याजासह रक्कम शासन तिजोरीत जमा करावी .अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे जर या तक्रारी ची दखल न घेतल्यास न्याय मागण्यासाठी सक्षम न्यायलयात जाणार असे तक्रारी निवेदनात नमूद केले आहे.