पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते यशस्वी आयोजक नितिन झगरे यांचा धक्कादायक प्रवास

32

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी)

पुणे(दि.25ऑक्टोबर):-नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक सारख्या छोट्या गावातून येऊन पुणे सारख्या शहरामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचे काम नितिन झगरे यांनी केले. श्री न्यानेश्वर कॉलेज चे पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते महाराष्ट्राचे एक यशस्वी आयोजक हा नितीन झगरे यांचा खरोखरच धक्कादायक प्रवास आहे.कॉलेज जीवना पासून चित्रपटात काम करण्याचे स्वप्न बघितले.स्वत: ही त्या क्षेत्रात कार्य करत असून दुसर्यांना ही तेथे घेऊन जात आहे.

चंदेरी दुनियेचे स्वप्न तर सर्वच जण बघतात त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे काम नितिन झगरे करत आहे.जॉब करत असतांनी सुद्धा नितिन यांचे मन कधीच जॉब मध्ये रमले नाही,त्यांचे स्वप्न होते की फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रवेश करायचा.अन ती संधी दिली दिग्गदर्शक रामकुमार शेडगे सर यांच्या अ.ब.क या मराठी चित्रपटातून स्वप्न साकार करुन नितिन ने कधीच मागे वळून बघितले नाही.दिग्गदर्शक डॉ.शशिकांत डोईफोडे सर यांनी नितिन वर विश्वास दाखवत बिग बजेट हिंदी चित्रपटात संधी दिली,त्या संधी चे नितिन ने सोने केले.

आता MX प्लेयर वर चे शूट पुर्ण केले. त्यानंतर स्वत:चे द रॉयल ब्रँड तयार करुन बिग मॉडेलिंग शो घेण्यास सुरुवात केली.अन बघता बघता रॉयल हे नाव सर्वश्रुत झाले.सहा महिन्यात 4 शो हिट केले.सौंदर्यवती मी महाराष्ट्राची या शो ने तर महाराष्ट्रा मध्ये इतिहास घडविला.त्या मध्ये त्यांनी 15 आदर्श महिलांना स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार दिला. सध्या नितिन झगरे यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.नितिन यांनी मॉडेल्स ना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिल्या.

कोरोना च्या काळात सुद्धा नितिन यांनी ऑनलाईन शो मोठ्या प्रमाणात घेतले अन यशस्वी केले.सध्या पुणे मध्ये मॉडेलिंग एव्हेंट मध्ये नितिन यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.एक सर्व साधारण व्यक्तीमत्व अशी नितीन झगरे यांची फिल्म इंडस्ट्री मध्ये ओळख आहे.ग्रामीण भागातील कलाकारांना पुढे घेऊन जाण्याचे काम नितिन झगरे करत आहे. सर्व महाराष्ट्रात मॉडेलिंग शो आयोजित करण्याचे नितिन झगरे यांचे स्वप्न आहे.

या कार्यात नितिन यांना मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे,भोसले,डॉ.आशिष,रजपूत,ज्योतिबा उबाळे,संपतराव भोसले साहेब, रेणुकाताई ठाणगे-ब्रँड अम्बेसिडर ,वर्षाताई ढमढेरे,नमिताताई पाटील,ज्योतीताई लाड,सविता एस.के,तृप्ती ढवन,ऐश्वर्या कुंटे,जान्हवी पाटील यांनी सहकार्य केले. आई वडीलांच्या कृपा आशीर्वादाने हे दिवस पाहयाला मिळाले,आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, आपल्याला यश किर्ती लाभो…..