सोनुली ( देवपायली ) येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजुर

76

🔸जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याला यश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.25ऑक्टोबर):-तालुक्यातील पारडी- मिंडाळा-बाळापुर जि.प.क्षेत्रातील देवपायली ग्रामपंचायत अंतर्गत सोनुली (खुर्द) या आदिवासी बहुल व जंगलव्याप्त गावाला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांना यश प्राप्त झाले आहे.

आपल्या जि.प.क्षेत्रातील प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजनांमार्फत निधी आणुन अनेक विकासकामे गजपुरे हे आपल्या कार्यकाळात पुर्णत्वास नेत अपेक्षापुर्ती करीत असल्याने जागरुक व विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणुन परिसरात त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवपायली येथील माता माणकादेवी च्या मागील वर्षी झालेल्या नवरात्र उत्सवात प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी देवपायली व सोनुली येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला होता.

याची जाणीव ठेवत जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे या गावच्या योजनेसाठी पाठपुरावा सुरु केला. दरम्यानच्या काळात कार्यकारी अभियंता पिपरे साहेब ,भुजल विभागाचे सहा.भुवैज्ञानिक दुबे साहेब, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जि.एस.बारसागडे , कनिष्ठ अभियंता एम.के.नंदेश्वर यांच्या टीमने देवपायली व सोनुली गाव तसेच परीसरातील जलस्त्रोताची संजय गजपुरे व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली.

दोन्ही गावातील लोकसंख्या व अंतर लक्षात घेता दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कराव्या लागतील असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार देवपायली व सोनुली अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना संदर्भात अंदाजपत्रके विभागामार्फत तयार करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मान. आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार , मान.खासदार अशोकभाऊ नेते , मान.आमदार बंटीभाऊ भांगडिया , मान. विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे संजय गजपुरे यांनी पाठपुरावा सुरू केला व अखेर मंजुरी प्राप्त करून घेतली. सध्या सोनुली येथील १७,१९,७८५ रु. किंमतीची योजना मंजूर झाली असुन यावर्षीच्या नवरात्र उत्सवादरम्यान निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

येत्या सहा महिन्यात ही योजना पुर्णत्वास येणार आहे. त्यामुळे सोनुली येथील नेहमीची पाणीटंचाई दुर होणार आहे. लवकरच देवपायली सह नवेगाव हुंडेश्वरी, कोसंबी गवळी या गावांचीही नळ पाणीपुरवठा योजना अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. सोनुली ची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल उपरोक्त लोकप्रतिनिधींसह जि.प.च्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले व माजी अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचे संजय गजपुरे यांनी आभार मानले आहे.

सोनुली येथील पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल माजी सरपंच सौ.योगिताताई देशमुख , सौ.इंदिराताई नवघडे व तुळशिदास कुळमेथे , माजी उपसरपंच सौ.वरठे मॅडम ,माजी ग्रामपंचायत सदस्य धनपाल नवघडे , महेन्द्र नवघडे , सोनुली चे माजी पोलिस पाटील केवळरामजी भानारकर , डाॅ.मदन अवघडे, भाजपा जि.प.सर्कल प्रमुख धनराज बावणकर , राजुभाऊ गुरपुडे, शांताराम मडावी , लक्ष्मणजी कोहपरे , दयारामजी खेवले, दिलिप भोयर , मुखरुजी संदोकर , हिरामणजी कुळमेथे तसेच गावकऱ्यांनी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे आभार मानले आहे.