सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे मा.अा .विजयराव खडसे यांनी केली २५ कोटींच्या विकास कामाची मागणी

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.2नोव्हेंबर):-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी शनिवारी उमरखेड येथे धावती भेट दिली.या भेटीत मा.अा.विजयराव खडसे यांच्या नेतृत्वात काॅग्रेसने त्यांच्याकडे उमरखेड विधानसभा मतदारसंघातील विकास कामासाठी २५ कोटींचा निधी देण्याची मागणी केली. ना.अशोकराव चव्हाण यांनी विदर्भातील अविकसित भागात विकास कामाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.

खडसे यांनी डोंगराळ भागातील समस्या रस्ते ,पूल,विश्रामगृह ,सहस्रकुंड धबधबा ,पैनगंगा अभयारण्य,अंबोना तलाव ,अंबाळी देवस्थान आदी ठिकाणच्या समस्या मांडल्या.त्यासाठी २५ कोटींच्या निधीची मागणी केली ना.चव्हाण यांनी निधी उपलब्ध देण्याची ग्वाही दिली.

यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे ,पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे,रमेश चव्हाण,नंदकीशोर अग्रवाल,दत्तराव शिंदे,अॅड.शिवाजीराव वानखेडे,राधेशाम भट्टड,किशोर ठाकूर, रामराव नरवाडे, सोनु खतिब ,शे.तालीब,
राहुल वानखेडे,विरेंद्र खंदारे,मंचक चव्हाण,अमीन पठाणक्ष आदी उपस्थित होते.
…………………………
मा.अा.विजयराव खडसे हे जेष्ठ राजकारणी आहेत .
तर त्यांच्या पत्नी जिल्हापरिषद अध्यक्षा होत्या .मुलगा प्रज्ञानंद खडसे हे पंचायत समिती सभापती आहेत. त्यांचा परिवार हा काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे . महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. विजयराव खडसे हे आमदार होते तेव्हा मतदार संघातील विकास कामासाठी त्यांनी भरपूर निधी उपलब्ध करुन आणला होता .त्यांच्या कार्यकाळात विकास कामे झाली. आजरोजी ते माजी आमदार असलेतरी त्यांना मतदार संघातील जनतेची काळजी आहे . त्यांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे . ना.अशोकराव चव्हाण यांचेकडे त्यांनी २५ कोटींचा विकास निधी देण्यासाठी विनंती केली