अप्पर पेनगंगा कामात तेलंगणाची आघाडी तर विदर्भात सिंचन कामात बिघाडी?

74

🔸तीन दशकापासून चर्चित कधी वरदान ठरणार?

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जीवती(दि.3नोव्हेंबर):-विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्य यासाठी वरदान ठरणारा अप्पर पेनगंगा या प्रकल्पासाठी राजकीय इच्छाशक्ती मध्ये उदासीनता असल्याने अनेक राजकीय पक्षाकडून पाणी परिषद सिंचन आंदोलन शेतकरी मिळावे यापुरतेच मर्यादित असल्याचे तीन दशकापासून अनुभव शेतकऱ्यांना आला.

प्रकल्प दिव्यस्वप्न ठरणार तर नाही ना अशी परिस्थिती असून महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ चंद्रपूर भागातील कोणाचा वाजता 85 टक्के कर तेलंगाना राज्याचा 15 टक्के वाटा सिंचनात असताना कोरपना तालुक्याच्या सीमेपर्यंत मुख्य कालवे कालव्याचे काम जयनाथ मंडळ व बेला मंडळ भागात पूर्णत्वाकडे जात असताना मात्र विदर्भातील राजूरा चंद्रपूर कोरपना वनी झरी जामनी आर्णी पांढरकवडा आदिवासी व दुर्गम भागातील तालुक्यांचा समावेश पैनगंगा प्रकल्प मध्ये आहे.

मात्र अजून त्यासाठी आवश्यक जमीन भूसंपादन व खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही त्यामुळे भागातील शेतकरी गेल्या तीस वर्षापासून हरित क्रांतीच्या अपेक्षा करीत आहे भूसंपादन करण्यापूर्वी 20 वर्ष शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी विक्री व्यवहार बंदी करून परवानगी घेऊनच विक्री व्यवहार हाताळण्याचे अस्तित्वात आले यामुळे यांना कैचीत पकडून प्रक्रिया होण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना करण्यात आले.

प्रकल्पामुळे घरातील 5 सिमेंट उद्योग कोळसा खाणी व शेतकऱ्यांसाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प असला तरी सिंचन प्रकल्प बांधकामात महाराष्ट्र राज्यातील विदर्भ क्षेत्र ज्या प्रमाणात पिछाडीवर आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पाणी मोठ्या प्रमाणात पडत असले तरी अनेक क्षेत्रामध्ये दुष्काळाचा सामना करावा लागतो महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या तेलंगाना राज्याने गोंडपिपरी जवळील चवेला प्रकल्पाचे काम युद्ध पातळी वर सुरू आहे.

तर वर्धा पैनगंगा नदी वरील कालेश्वर जवळील सिरोंचा तालुक्यामध्ये तेलंगणा राज्याचे सिंचन प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असून सिरोंचा येथून हैदराबाद येथील पाणी समस्यावर मात करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेऊन कुमार भीम आदिवासी जिला मंचेरियल जिल्ह्यात सिंचनक्षेत्राचे काम मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याने हरित क्रांति निर्माण होत आहे तर दुसरीकडे विदर्भातील जलसाठे नष्ट होऊन दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.

पैनगंगा प्रकल्पाचे काम थंड्या बस्त्यात पडल्याचे चित्र आहे विदर्भातील विकासाचा दृष्टिकोन असलेले नेते म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती आहे असे असताना मात्र त्यांच्या प्रयत्नातून देशपातळीवर बुलढाणा सिंचन प्रकल्प पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरू आहे विदर्भातील तीन जिल्ह्याला क्रांती निर्माण करणारा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या पैनगंगा प्रकल्पसाठी केंद्रशासन राज्य शासन पुढाकार का घेत नाही.

कृष्णा शेतकरी उपस्थित करू लागला आहे शेतकऱ्यांचे वाईट दिवस सारखे सुरू असताना उत्पादनात होणारी घट शेतकऱ्यांचे हवामानामुळे बदल झालेले वातावरण कापूस तूर सोयाबीन धानना उत्पादनालाबसणारा फटका कर्ज बाजारी मुळे विदर्भात वाढत्या आत्महत्या यावर चिंतन मंथन शेती तांत्रिक जोड शेतीतून पीक पद्धतीत बदल करण्यासाठी पाणी सिंचन पर्याय असल्याने अप्पर पेनगंगा या कामाला गती देऊन तेलंगणा राज्याच्या धर्तीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सय्यद आबिद अली यांनी संपदा मंत्री जयंत पाटील नागपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.