दिग्रस येथील भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारणी पुनर्गठित

29

🔸विनायक देवतळे यांची भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस अध्यक्ष पदी नियुक्ती

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

दिग्रस(दि.9नोव्हेंबर):- बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रसची कार्यकारणी ७/११/२०२० विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून स्थानीय बुद्ध विहार येथे पुनर्गठित करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिदास मोगले हे होते.तर प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष रविजी भगत, जिल्हा कोषाध्यक्ष राहुलजी राऊत हे उपस्थित होते.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व प. पू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून सामूहिक त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी संस्कार विभागाचे जिल्हा सचिव म्हणून प्रा. हरिदास मोगले यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून विनायक देवतळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका सरचिटणीस पदी एकनाथ मोगले, तालुका कोषाध्यक्ष म्हणून रमेश वहिले यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष रविजी भगत यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले व धम्मयान मराठी दिनदर्शिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी इंगोले साहेब, नंदू गुजर, प्रा. दिक्षा मोगले, महादेव धुळध्वज, मनवर सर, भानुदास भगत देविदास खंदारे राहुल गडे, यशवंत भरणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम उबाळे यांनी केले. आभार पळवेकर सर यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.