सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत राहणारच – रामप्रभु मुंढे

43

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12नोव्हेंबर):-गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगांव येथे ओला दुष्काळ जाहीर करावा याकरिता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलनं श्रीनिवास मुंढे मा.सभापती जि.प.परभणी यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून गंगाखेड तालुक्यातील सर्व ६ मंडळ वगळण्यात आले आहेत यावर्षी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला त्या मुळे शेतकरी बांधवांना सर्व हाताला आलेले पिक गेले.

राज्य शासन व प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून शेतकरीविरोधी हे सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अनुदान पासून वंचित ठेवत आहे, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी मधून गंगाखेड तालुका पूर्ण वगळण्यात आला आहे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही, राज्य शासनाने शेतकरी बांधवाना सोबत अन्याय करत आहे, राज्यशासन झोपेचे सोंग घेतले आहे का दिवाळी आली तरीसुद्धा मदत नाही – अनुदान नाही शेतकरी बांधवांना वंचित ठेवण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील बोगस बियाणे वर राज्य शासनाने अजून सुद्धा गुन्हे दाखल केले नाहीत शेतकरी बांधवांना न्याय दिला नाही, शेतकऱ्यांनी अजुन किती दिवस संघर्ष करावा आता तरी जागे व्हा आज रस्त्यावर उतरून विनंती करत आहोत तरी सुध्दा तुमचे डोळे उघडत नाहीत शेतकऱ्यांना न्याय द्या.परभणी जिल्ह्यातील आजुबाजूच्या जिल्हाला अनुदान मिळत आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याला का नाही ? भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसाठी सदैव रस्त्यावर आहे जोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असे रामप्रभु मुंडे म्हणाले..!

१) ओला दुष्काळ अनुदान मिळाले पाहिजे
२) विमा मिळाला पाहिजे
३) बोगस बियाणे अनुदान मिळाले पाहिजे

यावेळी उपस्थित मा.रामप्रभु मुंढे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, श्रीनिवास मुंढे मा.सभापती जि.प.परभणी, नारायण डोईफोडे, राम नागरगोजे, रवी रायभोळे, महादेव हाके, भास्कर भिसे, नाना केंद्रे, पप्पु जाधव, सखाराम मुसळे, मुदशिर सय्यद, यादव महात्मे, गोविंदराव घुले, विठ्ठल घरजाळे, स्वामी सर, गणेश जाधव, आबाजी मुसळे, बालाजी हाके मा.सरपंच, बाबुराव मुसळे मा.सरपंच, माधव खोकले, ओमकेश आंधळे, मनोज मुंडे, व मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणी करता राणीसावरगाव मंडळातील शेतकरी बांधव उपस्थित होते..