डॉ. अमोल पवार यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत आम आदमी पार्टी तर्फे अर्जं केला दाखल

33

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.14नोव्हेंबर):-येणाऱ्या 1 डिसेंबर 2020 रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम महाराष्ट्रात जोराने वाजवायला सुरुवात झाली आहे. समाजसेवा ‘नसानसात’ भिनलेले व कोरोनाच्या जागतिक महामारीत तन-मन-धनाने गोरगरीब लोकांना मदत करणारे, करोना आजारावर अभ्यासपूर्वक जनजागरण करणारे सर्व डॉक्टरांच्या मदतीने घेऊन पलूस तालुक्यात पहिले खाजगी ‘कोविड हॉस्पिटल’ उभारणारे उच्चशिक्षित – अभ्यासू- पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, संविधान समर्थक डॉक्टर अमोल पवार यांना आम आदमी पार्टीची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

अत्यंत कमी कालावधीत भारतीय राजकारणात आपल्या कार्यशैलीने एक वेगळा ठसा उमटवणारी पार्टी म्हणजेच आम आदमी पार्टी. अश्या आप पार्टीची अधिकृत उमेदवारी डॉ.अमोल पवार यांचे समाजोपयोगी कार्य व जनसामान्यात असलेली सकारात्मक प्रतिमा आणि निवडणूक निवडून येण्याची दाट शक्यता या गुणवत्तेवर अधिकृत उमेदवारी 7 नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ अमोल पवार यांनी आम आदमी पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आज दाखल केली. आप पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनवणे, इम्तियाज खान, सतीश यादव,असगर बेग, चेतन बेंद्रे ,स्मिता पवार, केदार ढमाले, आनंद अंकुश, सुभाष करांडे, अभिजित परदेशी, विक्रम गायकवाड, विकास लोंढे, निखिल देवकर, मनोज थोरात, ज्ञानेश्वर गायकवाड, सुजित आगरवाल, बाबासाहेब जाधव,मारुती गायकवाड, रोहन रोकडे,आप्पासाहेब ननावरे, मोहनसिंग रजपूत, शीतल अदमाने, प्रा एस आर पाटील,प्रशांत सावंत ,विकास कांबळे,श्रीकांत शिंदे,वेदांत पाटील,रंगराव पाटील,ओंकार पाटील,अनिकेत पाटील,अमोल मडामे, सुशांत कोलप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे पदवीधर मतदार संघातील विविध सामाजिक संघटना संस्था, जसे महामार्ग संघर्ष समिती, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच, बऱ्याच डॉक्टर संघटना, सांगली जिल्ह्यातील इतर पुरोगामी परिवर्तनवादी जनसंघटनानि डॉक्टर अमोल पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे आणि दिवसेंदिवस इतर जनसंघटनांचा पाठिंबा वाढतच आहे.

त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. आजच्या पत्रकार भवन पुणे येथील पत्रकार परिषदेत आपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल पवार यांच्यासह आप पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटन मंत्री डॉ अभिजीत मोरे , इम्तियाज खान , सतीश यादव, डाॅ. नितीन पवार उपस्थित होते.