राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक शुभम सेलोरे यांची पूर्व प्रजासत्ताक संचालनासाठी निवड

60

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.14नोव्हेंबर):-26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनी संपन्न होणाऱ्या पूर्व प्रजासत्ताक संचालनासाठी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक द्वारा संचालित अँडमिनीस्ट्रेटीव्ह सर्व्हिस डिग्री कॉलेज नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील रहवासी BACS तृतीय वर्ष मध्ये शिकत असलेला शुभम सेलोरे याची राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक याची निवड झाली आहे.

पूर्व प्रजासत्ताक संचालनाचे शिबिर (दि.20 ते 29 नोव्हेंबर) या कालावधीत अनुराग विद्यापीठ,घाटकेसर,हैद्राबाद (तेलंगणा) येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याने आपल्या निवडीचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र राठोड सर ,रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी अनुप सायरे ,विद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद ,सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व आई वडील यांना दिले.