सांडवा येथे बिरसा मुंडा जयंती पर्वावर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.19नोव्हेंबर)- तालुक्यातील सांडवा येथे महात्मा रावण, क्रांतीसुर्य क्रांतिवीर, बिरसा मुंडा व आदिवासी सांस्कृतिपर कार्यक्रम अतिशय उत्सवात साजरा करण्यात आला.सर्वंप्रथम महात्मा रावण यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावामधून मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. नंतर बिरसा क्रांती दल शाखा सांडवाच्या हस्ते बिरसा मुंडाच्या स्मारकांच्या जागेचे भुमीपुजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये आदिवासी संस्कृती अखंड चालू राहावी. या अनुषंगाने आदिवासी वेशभूषा, लोकनृत्य, दंडारन असे विविध सामाजिक संस्कृती दाखवण्यात आली.या दंडारण कार्यक्रमामध्ये असणारे कलाकार कैलास मोरे ,बाबुराव चिरमाडे ,गोविंद गारोले ,प्रसराम पांडे, हरिदास पांडे ,शंकर झाडे ,विट्टल मिरासे , महिपत बोके, जिजाबाई झाडे , झिंगाबाई पोटे ,सोनबा फोपसे व गावातील इतर कलाकारांनी सहभाग घेतला होता .या रॅली नंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली.सर्वप्रथम मंचावर दीपप्रज्वलन झाले .व नंतर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा रावण या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष(बिरसा क्रांती दल शाखा सांडवा अध्यक्ष) मा.साहेबराव पांडे, प्रमुख वक्ते मा. प्रा कैलास बोके सर जिल्हाध्यक्ष,तर प्रमुख पाहुणे म्हणून बीकेडी सांडवाचे महिला अध्यक्षा ताईबाई वाळके , माजी उपसरपंच ज्ञानेश्वर झाडे ,पोलीस पाटील संजय सांडवकर , व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .कैलास बोके यांनी केले . नंतर सत्कार कार्यक्रम घेण्यात आला .मुलाना स्पर्धा परीक्षाचे मोफत शिकवणी वर्ग सुरू करणारे पवन दांडेगावकर यांचा मान्यवरच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना मा.प्रा कैलास बोके यांनी आदिवासी महात्मा रावण यांचा सर्व इतिहास सांगितला व सामाजिक, शैक्षणिक,अर्थिक इत्यादी बाबी गावकऱ्यांना पटवून सांगितल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोके व आभार प्रदर्शन विट्टल झाडे यांनी केले .या कार्यक्रमाला सर्व गावकरी मंडळी व बिरसा क्रांति दल शाखा सांडवा चे अध्यक्ष व सदस्य आणी समस्त मंडळी उपस्थित होते.