हिंगणघाट येथील हूरकट यांचे फ्लॅटमध्ये भर दुपारी झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपिना घेतले ताब्यात

28

🔺वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाची कारवाई

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.२५नोव्हेबर):- शहरातील कोठारी कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे हरीश हूरकट यांचे फ्लॅटमध्ये भर दुपारी झालेल्या ३८ लाख रुपयांचे सोने तसेच डायमंड ज्वेलरी धाडशी चोरी प्रकरणातील अंकुश दगडू धंदरे वय 32 राहणार खर्डी सालोरी तालुका खामगाव आणि सचिन पंजाबराव आपटेवार वय ३० राहणार वेरणा जिल्हा बुलढाणा यांना वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्यांच्या निवासी गावातून ताब्यात घेतले असून पोलिसांनी आज त्यांना हिंगणघाट न्यायालयात हजर केले. पोलिसांचे मागणीवरुन न्यायालयाने त्यांना येत्या २७ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. सदर आरोपी जवळ घरफोडी चोरलेले ११ लक्ष ६१ हजार २११ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

सदर घरफोडी प्रकरणातील सूत्रधार लहू दगडू धंदरे तसेच राजेंद्र उर्फ सर्जा सोनू भोसले असून त्यांचा शोध घेण्यासाठी वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उस्मानाबाद जिल्ह्यात शोध मोहिमेअंतर्गत गेले आहे. अटकेतील दोन्ही आरोपीकडून रोख साडेपाच लाख रुपये, ११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३९ हजार २११ रुपये किमतीचे ६०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने इत्यादी जप्त केले आहे.

पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर या प्रकरणी विशेष लक्ष देत असून सायबर सेलच्या माध्यमातून त्यांनी आरोपींना शोधून काढण्यासाठी प्रयत्न केले सदर घटनेच्या दिवशी घटनेच्या दिवशी हिंगणघाट शहरात बाहेर गावातून आलेल्याचे मोबाईलचे लोकेशन तसेच घटनेनंतर बाहेर गावात गेलेल्यांचे मोबाईलचे टावर लोकेशन सीसीटीव्ही फुटेज इत्यादि माहिती आरोपींना शोधण्यात सर्वात महत्त्वाची ठरली आहे.या प्रकरणी घटनेच्या दरम्यान करण्यात आलेल्या हजारो मोबाइल कॉल्स डिटेल्सची छानबीन करण्यात आली.अनेक प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर आरोपींचा शोध लागला असल्याची माहिती ठाणेदार पिदुरकर यांनी दिली.

हरीश हुरकट व यांच्या कुटुंबातील सदस्य घरी नसल्याची संधी साधून भरदुपारी त्यांच्या फ्लॅटच्या दाराचा कोंडा तोडत चोरट्यांनी ३८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
घरफोडीसंदर्भात माहिती मिळताच हरीश हुरकट व कुटुंबिय ८ नोव्हेंबर रोजी दुपारी हिंगणघाटला परत आले.

चोरीची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल होताच पोलिस अधिक्षकांसह वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. हिंगणघाट पोलिसांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी तसेच वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेने या आव्हानात्मक घरफोडीचा तपास करीत आरोपींचा शोध घेतला.

परवा तब्बल १५ दिवसांनंतर घरफोडीतील दोन आरोपींना ताब्यात घेताच हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली गेली त्यानंतर हिंगणघाट तसेच वर्धा पोलीस महितीनुसार खामगाव तालुक्यात गेले आणि रात्री दोन्ही आरोपींना काल दिनांक २४ नोव्हेंबर रोजी हिंगणघाट आणले. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात वर्धा येथील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक निलेश ब्राह्मणे हिंगणघाट चे ठाणेदार भानुदास पिदुरकर तसेच त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे.